ह्या श्लोकांतील विजेच्या उपमेंत अतिशय कृशांगत्व, हा, व पूर्णिमेच्या रात्रीच्या उपमेंत आपल्या शोभेनें सर्व लोकांना प्रकाशित करणें हा, त्या सुंदर स्त्रीचा प्रत्येक उपमेंत निराळा असणारा पण अनुगामी, असा समान धर्म आहे. या श्लोकांतील पूर्वार्धांत आलेलीं दोन विशेषणें काढून टाकल्यास, याच ठिकाणीं अनिर्दिष्ट अनुगामी धर्माचें उदाहरण मिलेल. बिंबप्रतिइंबिंबभाव पावलेल्या समान धर्माचें उदाहरण, पूर्वीं आलेल्या “तीरे तरुण्या वदनं सहासम्” इत्यादि श्लोकांत पहावे, अथवा याचेंच (म्हणजे बिंबप्रतिबिंबभावयुक्त समान धर्माचें) दुसरें हे उदाहरण :---
“कोवळ्या पालवीनें युक्त असलेली ही लता आहे का विकसित कमलांनीं युक्त असलेली कमलिनी आहे ? असा संश्य, जिचे हातपाय तळपत आहेत, व जिच्या मुखावर हास्य खेळत आहे अशा तिला पाहणार्या लोकांच्या मनांत उत्पन्न झाला.”
ह्या श्लोकांत एका बाजूला हात आणि मुख हे बिंब, व दुसर्या बाजूला कोमल पालवी व प्रफुल्ल पद्म हे प्रतिबिंब, अशा (अनुक्रमें) येणार्या दोन कोटींचा पृथक निर्देश केला आहे.
“श्रीरामाच्या जन्माच्या वेळीं दशरथाच्या प्रसूतिहाकडे पाहतांना, हा समुद्राचा अंतर्भाग आहे, का हा अत्रिऋषींचा डोळा आहे का हें भगवान् निष्णूचें मन आहे असा संशय कवींच्या सुद्धा मनांत आला”
ह्या ठिकाणीं तदानीम् (त्या वेळीं) या पदानें प्रस्तुत प्रकरणाचें सहाय मिळाल्यामुळें, दशरथाचे गृह या संदेहाच्या धर्मींनें, म्ह० विषयानें, त्याच वेळीं जन्मलेल्या भगवान् रामचंद्राचा आक्षेप केला आहे; आणि नंतर या बिबंभूत रामचंद्राचा प्रतिबिंबभूत जो साधाराण चंद्र त्याचा, समुद्राचा अंतर्भाग वगैरे संशयाच्या तीन कोटीनी, आक्षेप केल आहे. (म्ह० या श्लोकांत राम हे बिंब व जलध्युदर इत्यादि तीन संशयाच्या कोटींनीं आक्षिप्त चंद्र, प्रतिबिंब) या दोहोंचा म्हणजे बिंबप्रतिबिंबांचा निर्देश नसला तरी, ते सूचित असूनही साद्दश्याला कारण होतात.
वरील विवेचनावरून “अनुगामी धर्माचाच केवळ लोप संभवतो. बिंबप्रतिबिंबभावयुक्त धर्माचा लोप संभवत नाहीं.” असे म्हणणार्या लोकांचें खंडन झालें.