उल्लेखालंकार - लक्षण ५
रसगंगाधर ग्रंथाचे लेखक पंडितराज जगन्नाथ होत. व्याकरण हा भाषेचा पाया आहे.
अथवा, (शुद्ध) उल्लेखालंकाराचें हें दुसरें उदाहरण :---
“ दुसर्याच्या दु:खाच्या बाबतींत भ्यालेले पण, स्वत:च्या दु:खाविषयीं अगडीं निर्भय; धनाविषयीं अगदीं निर्लोभी, पण यशाविषयीं पूर्ण लोभी; असे सज्जन पुरुष विद्यमान आहेत.”
ह्या ठिकाणीं ‘साधव; सन्ति’ (सज्जन अजून विद्यमान आहेत) याचा सूचित अर्थ - ते मेले असले तरी ते मेल्यासारखेच नाहींत; आणि सज्जनाहून इतर, मेले नसले तरी मेल्यासारखेच आहेत. व या सूचित अर्थद्वारां सज्जनांच अत्यंत उत्कर्षही सूचित झाला आहे. ह्या (प्रधान) सूचित अर्थाला उपस्कारक असा हा उल्लेखालंकार आहे. अथवा.
(शुद्ध उल्लेखालंकाराचें हें आणखी एक उदाहरण) :---
“तापसांच्या समूहाच्या ठिकाणीं शीतल वाटणारे व तमोगुणांनीं युक्त अशा पाप्यांच्या ठिकाणीं तापदायक, असे श्रीरामचंद्राचे कटाक्ष माझ्या कल्याणाला कारणीभूत होवोत.”
पूर्वीच्या दोही श्लोकांतील उल्लेख, विषय अनेक असल्यामुळें, झाला आहे. पण ह्या श्लोकांत, कटाक्षांचें अनेकत्व, ते कटाक्ष ज्यांच्यावर पडले त्या अनेक आश्रयामुळें झालेलें आहेत. (आणि त्यामुळें उल्लेखालंकार झाला आहे.)
“विद्वानामध्यें विमलज्ञानानें युक्त असे; यतींच्यामध्यें विरक्त होऊन राहिलेले; व आपल्या वर्गांतील लोकांमध्यें विषाचें फूत्कार सोडणारे असे, नाना आकार धारण करणारे दुष्ट पुरुष ह्या पृथ्वीवर आहेत.”
ह्या ठिकाणीं, विद्वान् यति वगैरे बरोबर असणार्या लोकांच्या भिन्नतेमुळें, खलांचें अनेकविधत्व झालें आहे. ह्याचप्रमाणें, इतर संबंधी पदार्थां च्या भेदामुळें होणारा उल्लेखांतील अनेकपणा शोधून काढावा.
संकीर्ण (मिश्रित) उल्लेखालंकाराचें हें उदाहरण :---
“हे राजा, तुझ्या कीर्ति, आकाशांत चांदण्याप्रमाणें दिसतात; हिमालया पर्वतावर बर्फाप्रमाणें शोभतात व पूथ्वीवर समुद्राप्रमाणें भासतात.”
ह्या श्लोकांत वर वर प्रतीत होणार्या उपमेशीं, व श्लोकाच्या शेवटीं प्रतीत होणार्या उत्प्रेक्षेशीं उल्लेखालंकार मिश्रित झाला आहे.
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP