दीपक अलंकार - लक्षण १
रसगंगाधर ग्रंथाचे लेखक पंडितराज जगन्नाथ होत. व्याकरण हा भाषेचा पाया आहे.
(कांहीं) प्रकृत व (कांहीं) अप्रकृत (अशा पदार्थांचा) एका साधारण धर्माशीं अन्वय म्ह० दीपक (अलंकार). पूर्वींच्या (तुल्ययोगिते) प्रमाणें येथेंही साद्दश्य व्यंग्य असतें. प्रकृताकरतां घेतलेला (सांगितलेला) धर्म प्रसंगानें येथें अप्रकृताचें दीपन करतो, म्ह० त्याला प्रकाशित करतो, म्ह० त्याला सुंदर बनवितो, म्हणून या अलंकाराचें दीपक हें नांव (दीपयति इति दीपकम् - या व्युत्पत्तीला अनुसरून). अथवा दीप इव (दिव्याप्रमाणें) इति दीपकम्. (दीपक) हें अलंकाराचें विशेषनाम. संज्ञा (विशेषनाम) करण्याकरतां, दीप या शब्दाला कन् (क० प्रत्यय लावून, ‘दीपक’ हा शब्द तयार केला. दिव्याचें (दीपाचें) साद्दश्य असें कीं, (ज्याप्रमाणें उंबरठयावर ठेवलेला दिवा घराच्या आंतल्या जागेवर व बाहेरच्या जागेवर उजेड पाडतो, त्याप्रमाणें हा अलंकारही,) प्रकृत व अप्रकृत पदार्थांना प्रकाशित करतो म्हणून दीपक - असें समजावें. उदा० :---
“अमृत, चांदणें, सुंदर कविता, व सज्जन ह्यांचें निर्माण कुणाला संतोष देत नाहीं ?” (ह्या चार पदार्थांपैकीं कोणता तरी एक प्रकृत व बाकीचे सर्व अप्रकृत होता - वक्त्याच्या इच्छेप्रमाणें.) अथवा हें (दीपकाचें) उदाहरण :---
हे राजा, अमृत, चांदणें, संजीवनीरूपी मोठी औषधि; व दयापूर्ण दृष्टीचा तूं - ह्या सर्वांचा विश्वाला सजीव करणें हा गुण आहे.
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP