अप्रस्तुतप्रशंसा अलंकार - लक्षण १
रसगंगाधर ग्रंथाचे लेखक पंडितराज जगन्नाथ होत. व्याकरण हा भाषेचा पाया आहे.
“अगम्य अप्रस्तुतानें वाच्य प्रस्तुताचें उपस्करण म्हणजे समासोक्ति. ही सांगून झालीं. आतां हिच्या थेट उलट असलेली अप्रस्तुतप्रशंसा सांगतों.”
“वाच्य अप्रस्तुत व्यवहारानें, साद्दश्य वगैरे पुढें सांगितल्या जाणार्या प्रकारांपैकीं कोणत्याही एका प्रकाराचे द्वारां प्रस्तुत व्यवहार ज्या ठिकाणीं सांगितला जातो ती अप्रस्तुतप्रशंसा.
प्रशंसन म्हणजे केवळ वर्णन. स्तुति करणें नव्हे. “ धिकतालस्योन्नततां यस्य छायापि नोपकाराय” [तालाच्या उंच वाढण्याला धिक्कार असो. कारण त्याची छाया पण, (दुसर्यावर) उपकार करीत नाहीं.] इत्यादी ठिकाणीं [ प्रसंसनाचा अर्थ स्तुति मानला तर, अप्रस्तुतप्रशंसेच्या लक्षणाची यांत] अव्याप्ति होण्याचा प्रसंग येईल. (म्हणजे धिक्तालस्य० ही आर्या अप्रस्तुतप्रशंसेंत येणार नाहीं.)
ही पांच प्रकारची असते. अप्रस्तुतानें स्वत:सारखें प्रस्तुत ज्या ठिकाणीं सूचित केलें जातें ती पहिली: (अप्रस्तुत) कार्यानें प्रस्तुत कारण जिच्यांत सूचित केलें जातें ती दुसरी; (अप्रस्तुत) कारणानें प्रस्तुत कार्याचें ज्या ठिकाणीं सूचन केलें जातें ती तिसरी; (अप्रस्तुत) सामान्यानें प्रस्तुत विशेषाचें जेथें सूचन केलें जातें ती चौथी; व (अप्रस्तुत) विशेषानें प्रस्तुत सामान्याचें जेथें सूचन केलें जातें ती पांचवी.
(अशा रीतीनें अप्रस्तुतप्रशंसा पांच प्रकारची असते.)
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP