अप्रस्तुतप्रशंसा अलंकार - लक्षण ४
रसगंगाधर ग्रंथाचे लेखक पंडितराज जगन्नाथ होत. व्याकरण हा भाषेचा पाया आहे.
उदा० :--- ‘परागानें युत (विटाळशी असलेल्या) फिक्कट पांढर्या वर्णाच्या (फिक्की पडलेल्या) पुष्कळ काटयांनीं भरलेल्या (जिचें अंग रोमांचांनीं भरलें आहे अशा) केतकीचा, हे भुंग्या ! तूं निर्लज्ज होऊन कसा रे उपभोग घेतोस ?’ ह्या ठिकाणीं अप्रस्तुत केतकी हा वाच्यार्थ व प्रस्तुत नायिका हा (गम्यार्थ) या दोन्ही अर्थांमध्येंही “उपभोगण्यास अयोग्य” याला कारण म्हणून ज्याप्रमाणें रजांनीं (परागांनीं) पूर्ण असणें व विटाळशी असणें या दोन्ही अर्थांनीं युक्त असलेलें विशेषण ज्याप्रमाणें लागू पडते त्याप्रमाणें, फिक्का वर्ण असणें व कंटकानें भरून जाणें हीं दोन विशेषणें कारण म्हणून उपयोगी पडत नाहींत; कारण, फिक्कट पांढरा वर्ण असणें हा केतकीमध्यें दोष नसून उलट गुणच आहे; अर्थात् (हें विशेषण उपभोगाच्या अनौचित्याला कारण म्हणून घ्यावयाचें असल्यास,) पांडुरत्वाच्या बाबतींत (फिव्कट वर्णाच्या बाबतींत) केतकीशीं नायिकेचें तादात्म्य करणें जरूरीचें आहे. याचे उलट, कंटकत्व या विशेषणाच्या अंशांत नायिकेशी केतकीचें तादात्म्य करणें जरूरीचें आहे; कारण रोमांचित होणें हें स्त्रियांचे बाबतींत, त्याग करण्याला योग्य कारण नाहीं; इतकेच नव्हे तर, उपभोग करण्याला उलट अनुकूल आहे.
कार्यानें कारण जिच्याम्त सूचित होतें अशा अप्रस्तुतप्रशंसेचें उदाहरण :---
“हे पृथ्वीवरील इंद्रा ! (राजा,) तुझ्या वीरत्वाचें आम्ही वर्णन काय करावें ? तुजा लाल डोळ्ला, सहज कौतुकानें, आपली भुवी वांकडी करून तुझ्या पुष्ट बाहूकडे पाहू लागला कीं विंध्य पर्वताच्या व गंधमादन पर्वताच्या गुहेजवळील वृक्ष, नाना भूषणांच्या रत्नांच्या जाळ्यानें भरून गेलेले असे, तत्काळ होतात.”
ह्या ठिकाणीं विंध्याच्या अरण्यांतील वृक्ष भूषित होतात असें म्हणण्यानें (म्ह० कार्य सांगण्यानें) शत्रूंचें पळून जाणें (हें कारण) सुचित हात.
पुढें सांगितलेल्या प्रकारानें हा श्लोक पर्यायोक्त अलंकाराचा विषय होऊ शकतो असें म्हणत असाल तर, हें घ्या या (अप्रस्तुतप्रशंसेच्या) प्रकाराचें (सुटें) उदाहरण :----
‘कमळांच्या माळाही अत्यंत कठोर वाटतात: विचार करतां, कमळांचे देठही नाजुक वाटत नाहींत; तुझ्या चिमुकल्या अंगाच्या कोमळपणाचा विचार करतां, कोवळ्या पालवीच्या कोमलपणाची पण काय कथा ?” (काय किंमत ?)
ह्या ठिकाणीं, कोमल पालवी वगैरेचा तिरस्कार करणें हें जें (अप्रस्तुत पण वाच्य) कार्य त्याच्या योगानें, नायिकेच्या अंगाचें अत्यंत सौकुमार्य ह्या (प्रस्तुत) कारणाचें सूचन झालें आहे. कार्यकारणभाव हा या ठिकाणीं फक्त ज्ञानांच्या बाबतींतच घ्यावा. तेव्हां कमळाच्या देठांत असलेला ट्णकपणा जाणला असतांना, त्यानें खरोखरच नायिकेच्या अंगाचें सौकुमार्य उत्पन्न झालें नसलें तरी हरकत नाहीं. याच द्दष्टीनें येथील कार्यकारणभाव समजावा.
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP