श्रीगुरूदत्त योगः - महाबंध

श्रीगुरूदत्तांनी जगाला योगशास्त्र दिले.


महाबंध --

पार्ष्णीं वामस्य पादस्य योनिस्थाने नियोजयेत् ।
वामोरुपरि संस्थाप्य दक्षिणं चरणं तथा ।
पूरयित्वा ततो वायुं ह्रदये चिबुकं द्दढम् ।
निष्पीडय वायुमाकुञ्च्य मनोमध्ये नियोजयेत् ।
धारयित्वा मथाशक्तीं रेचयेदनिलं शनै: ।
सव्यांगेषु समभ्यस्य दशांगे पुनरभ्यत्तेत् ॥ (ह. प्र.)
वामपादस्य गुल्फेन पायुमूलं निरोधयेत् ।
दक्षपादेन तदगुल्फं संपीडय यत्नत: सुधी: ॥
शनै: शनैश्वालयेत् पार्ष्णिं योनिमाकुञ्चयेच्छनै: ।
जालन्धरे धारयेत् प्राणं महाबन्धो निगद्यते ॥
महाबन्ध: परो बन्धो जरामरणनाशन: ।
प्रसादादस्य बन्धस्य साधयेत् सर्ववाञ्छितम् ॥

डाव्या पायाची टांच शिवणीस जोरानें लावून उजवा पाया डाव्या मांडीवर ठेवावा; नंतर पूरक करुन जालन्धर बंध करुण कुंभक करावा; व मन स्थिर करून हळूहळू रेचक करावा. याचप्रमाणें उजव्या अंगानें अभ्यास करावा. कारण याचेहि चंद्रांग व सूर्यांग असे दोन प्रकार आह्ते. याच्यामुळें नाडयांची उर्ध्वगति बंद होते.

N/A

References : N/A
Last Updated : December 23, 2014

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP