प्रसंग सहावा - मुसलमान कोण

श्री संत शेख महंमद ( १५६०-१६५०) महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील संत होते त्यांचे मुळ गाव श्रीगोंदा, जि अहमदनगर.
शेख महंमदाना महाराष्ट्रात कबीराचा अवतार म्हणून ओळखले जाते.


मुसलमान म्‍हणविलें एक्‍या गुणें । मूसेस नव मास वस्‍तीकरुपणें । होतो म्‍हणऊनि म्‍हणवी वोळखा खुणें । पवित्र हो तुम्‍ही ॥११॥
आतां गर्भ मूसवेगळा जन्मता । मजला कोणी न दिसे तत्त्वतां । वोळखा कैसें आपुलिया मता । धर धरूं राहिलें ॥१२॥
जितुकें दिसें तितुकें मुसावले । मुसेवेगळें नाहीं चराचर जालें । हें पाहिजे अनुभवास आलें । संतां श्रोत्‍यांच्या ॥१३॥
सर्वांचें नांव सूनी मुसलमान । तें लपवोनि वैश्य क्षत्रिय ब्राह्मण । अनेक उपनाम लक्षण ।  बरळती असत्‍यासंगें ॥१४॥
ब्राह्मणांस म्‍हणतां सूनी मुसलमान । तरी तो होईल महा क्रोधायमान । ऐसें पहा सत्‍यार्थासी लपवून । असत्‍य मिरवितील ॥१५॥
जैसें अंग लपवोनि दाविजें वस्त्र । आणि म्‍यान दावोनी लपविजे शस्त्र । तेसा वेदांनीं केला विधि आचार । मूळ कूळ लपवोनिया ॥१६॥
ऐसें खरें लोपावें खोट्यामाझारीं । न्याहाळितां खोटें खर्‍याभीतरीं । नांवें वेष धरूनि परोपरी । स्‍वादा पातले असे ॥१७॥
स्‍वयें सांगत होतो सद्‌गुरूची थोरी । तों भेदावरी चाले वैखरी । ते कवित्‍वीं चर्चूनि नवलपरी । अनुसंधाना पातलों ॥१८॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP