प्रसंग आठवा - वेदभेदाची कुसरी

श्री संत शेख महंमद ( १५६०-१६५०) महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील संत होते त्यांचे मुळ गाव श्रीगोंदा, जि अहमदनगर.
शेख महंमदाना महाराष्ट्रात कबीराचा अवतार म्हणून ओळखले जाते.


सद्‌गुरुकृपा जालिया अगाध । हरपती द्वैतवेदाचे भेद । जैसा लोण्याचा जाला असे छेद । अग्‍निमुखें विरोनियां ॥२९॥
शब्‍द बोलणें तितुका वेदांत । अनुभव चर्चा तो सिद्धांत । या दोहीं विरहित तो बोधांत । स्‍वयें साधु असतील ॥३०॥
भला भेटीस येतो तें ऐकणें । तें जाणा असें वेदांत बोलणें । भेटला तो अनुभव जाणणें । वस्‍तीं श्रोतीं ओळखावें ॥३१॥
दीक्षा देखोनि आहिक्‍यता जाली । सर्व मन बुद्धि समाधान पावली । स्‍वयें तैसी असे साधूचि खोली । ईश्र्वर होऊनियां ॥३२॥
पवित्र ऐकिला होता श्रवणीं । तें लटिकें मानिलें होतें डोळियांनीं । जेव्हां तो भेटला असे येऊनी । तेव्हां डोळे खरे मानिती ॥३३॥
भेटीस आल्‍याचें गुण अवगुण । नेणती कांही नेत्र श्रवण । आत्‍मज्ञानानें ओळखोनियां लक्षण । चित्त समाधान पावलें ॥३४॥
तैसा वेदभेदाचा अभाव । शब्‍द बोलतां न फिटे संदेह । साधूनें केलासे निज वाव । स्‍वयें ईश्र्वररूप होऊनी ॥३५॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP