प्रसंग आठवा - भाव-भक्ति
श्री संत शेख महंमद ( १५६०-१६५०) महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील संत होते त्यांचे मुळ गाव श्रीगोंदा, जि अहमदनगर.
शेख महंमदाना महाराष्ट्रात कबीराचा अवतार म्हणून ओळखले जाते.
सांगितली वेद भेदाची कुसरी । सांगेन दृष्टीं पडेल ते हेरी । श्रोती सावध परोपरीं । गुह्य घ्यावें भावें ॥३६॥
सद्भाव सद्गुरु भक्तीपुढें । अनेक शास्त्रें दिसतील काबाडें । प्रेमें नामघोष वाडें कोडें । करावा श्रोतेजनीं ॥३७॥
कानीं गेठे असोन बहिरा बुचा । जो घोष ऐकेच ना निजनामाचा । आणिक ढवा जैसा हिजड्याचा । ठाके शिणघ्ज्ञारुनी ॥३८॥
डोळे असूनियां आंधळे वेडे । जो साधुतीर्थ न पाहे निवाडें । शिणघारूनि बैसविलें कानड्याचें मढें । तदन्याय त्याचा असे ॥३९॥
बोलोन मुका तो ऐका सांगेन । बाष्कळ बरळे न करी हरिकीर्तन । तो दृष्टीं न पडावा अवलक्षण । तेणें वदन कुंड केलें ॥४०॥
पाय असोनि फिरूनि लंगडा । जो ईश्र्वर यात्रेस नव जाय मूढा । सहकुटुंबाचा घातला खोडा । विषयालागीं फिरे ॥४१॥
कडीं आंगठ्या हातीं असोनि थोटा । जो पवित्रांस दान नेदी करंटा । अनाचारी भजे उन्मत्त खोटा । तो वाचेस न यावा ॥४२॥
शरीरीं नीट नेटका दिसत असे । अठरा अंगीं मूर्खत्व वसें । जैसा सिटाऊ गर्दभ दावी तमासे । बाळपणीं गर्दभीपाशीं ॥४३॥
नाक असोनि नकटा सांगेन । जो भावविण करी ईश्र्वरभजन । त्याचा जगीं होतसे अपमान । सद्गुरुकृपेविण ॥४४॥
पृथ्वीपती सुंदर राजा असे । नासिक नसतां तेज्यावरी बसे । नगरलोक हांसती वोखटा दिसे । तैसा भावाविण विधि ॥४५॥
जैसे नानापरी करुनी अलंकार । सुंदर वेश्या वसवी बाजार । निजभ्रताराविण अनाचार । भलताच सत्ता करी ॥४६॥
सोऽहं सगुण माळेतें विसरणें । अचेतन माळ फेरूनि दावणे । हे नष्ट ठकूं भोंदूची लक्षणें । असंख्यात देखिली ॥४७॥
नित्य सा शत एकविस हजार । मन सोऽहं मण्याचा करी उच्चार । ते माळ अधिकारिती ईश्र्वर । भक्ताचे सेवक होऊनी ॥४८॥
हे तत्त्वमाळा फेरूनि उदास । मग घरबारी अथवा वनवास । त्यास कदा काळीं नसे अपेश । वेषधारी मिथ्या असे ॥४९॥
ऐसा होईल त्या नांव योगिराज । तेणें सत्य साधिलें जन्माचें काज । त्यासी शेख महंमद सहज । लोटांगणें घालीतसे ॥५०॥
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP