प्रसंग नववा - ईश्र्वरी कर्तृत्वांतील गुणदोष
श्री संत शेख महंमद ( १५६०-१६५०) महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील संत होते त्यांचे मुळ गाव श्रीगोंदा, जि अहमदनगर.
शेख महंमदाना महाराष्ट्रात कबीराचा अवतार म्हणून ओळखले जाते.
निर्गुणा तुज नसतां पुरतेंपण । पुरता म्हणऊनि वणिलें भूषण । आम्ही भक्तराजीं लपविलें अवगुण। तुझें गुण दाऊनियां ॥५॥
सेंडगळासारिखी खोली भाषाज्ञान । मजला नाहीं दिधलें पूर्णपण । म्हणऊनि उखई मांडिली जाण । तुज ईश्र्वराची ज्ञानें ॥६॥
जोडिता जाता पुत्र जालिया उपरी । मायबाप हरुषती बरव्यापरी । तैसें तूं मज न करीच श्रीहरि । यालागीं द्वंदा पातलोसें ॥७॥
निर्गुणा मज दिससी अपुरता । उत्पत्ति करूनियां संहारिता । दाटण होईल श्रीअनंता । म्हणऊनि घात करिसी ॥८॥
सर्वत्र होणें तुज एकाशीं । आपल्यांत आपण भस्म करिसी । आनंदमयपणें अससी । करुनी अलिप्तपणें ॥९॥
उदंड पिकलें तें सांठविजे पेंवी । मागुती करीं तीं सेतें पेरावीं । तैसें तुवां मृत्युलोकी केलें स्वभावी । तुज पुरता पैसा नसतां ॥१०॥
एका चर्माची अनेक बाहुली । एक उदक रंगे रंगलीं । अनेक अवतराणाची नांवे ठेविली । जनांस दावावया ॥११॥
एकचि खेळवितां मंडपाकारीं । एकें वाचनें संपादणी करी । नानापरी बोले सभेमाझारी । जन रिझवितसे ॥१२॥
दाऊनि भरी चर्मपेटारी । तैसेंच तुवां केले गा श्रीहरि । पाप पुण्य या जनाभीतरीं । फैल घेसी सैताडपणें ॥१३॥
मी एक देव येर भक्तजन । मज एकास भजा भाव धरून । ऐसें बोललासी बोलविसी वचन । देव येर भक्तजन । मज एकास भजा भाव धरून । ऐसें बोललासी बोलविसी वचन । कवीश्र्वर होऊनियां ॥१४॥
मजविण आणिकांच्या भजनें । नरिये भोगाल बोलसी बुजावणें । आपलें आपण अर्गितां सांडणें । बाध न लगे कांहीं ॥१५॥
निर्गुणा आपुल्यास आपण केले बरें । करणी चुकलास ते ऐक विचारें । तुवां रवि शशि मागें अंधारें । सांग कां लावियेलें ॥१६॥
आणिक चुकलासी परमेश्र्वरा । आपुले स्तुतींत कां सोडिली निद्रा । भक्त निंदकांकून सळविलें ईश्र्वरा । हें चुकलासी ऐसें ॥१७॥
जेथें रुपावलासी तेथें गुण नाहीं । जेथें सगुण तेथें अरूप पाही । ऐसा हा अवगुण तुझा देहीं । सांग कां वर्ततसे ॥१८॥
स्वयें सोनेपणें सोनावलासी । तेथें कां सुगंधें सांडवलासी । काट्यांत परिमळलासी केवड्यासी । ऐसा चतुर तूं ॥१९॥
मखमालीचीं फुलें असती चंदना । तरी तुझें कर्तव्य थोर गा निर्गुणा । समुद्र सांडवता खारेपणा । तरी तुझा इनसाफ ॥२०॥
प्रत्यक्ष वोहळ असे काशी । जाऊनि मिळाली सागरासी । तेथें उद्धरणालागीं जनासी । कैसा उपाय केला ॥२१॥
सिंधुतीर्थासीं जावे नाहीं म्हणविलें । स्वयंभ पर्वतांस नाहीं पूजविलें । घडींव प्रतिमांसीं जन रिझविलें । स्वयें झकलीं झकलीं म्हणसी ॥२२॥
निर्गुण तुवां मुखाची वाचा हिरोन । कां न दिधली रविशशि लागून । भ्रमतां बोलते विश्र्वास उमजून । पुण्यार्थवचनें ॥२३॥
स्थुळीं हिर्याचा प्रकाश चतुरासी । दुसरें पांख गमन करावयासी । हें कर्तव्य चुकलासी हृषिकेशी । यालागी चतुर दुःखी ॥२४॥
कस्तुरी चहाडाचे जिव्हेस । देतां चुकलास अविनाश । कस्तुरीलागीं छेदितां जिव्हेस । दोन्ही कारणें साधती ॥२५॥
श्र्वानाचें उचित ॠतुकाळीं गुंतणें । तें सिंदळासी कां दिधलें नाहीं देणें । तोडिलयाविण तुटती उन्मत्तपणें । मदन विखाचि ॥२६॥
सिंदळीचे योनींत दांत असते । तरी सुंदरपणास कोणीच न भाळते । कदाचित गेलिया नपुंसक होते इंद्रिय झडूनियां ॥२७॥
दो डोळ्यांतील बाहुली उफराटी । तुवां केली असती निर्गुणा किरीटी । तरी हें विश्र्व सांगतें तुजसी गोष्टी । सद्गुरुकृपेविण ॥२८॥
मूर्खाचियां माथां शिंग नाहीं दिधले । हें निर्गुणा तुवां बहुत बरवें केलें । नाहींतरी साधुजनांस सिंगटले । असतें मूढ पणें ॥२९॥
पशूचें मांस चर्म कारणीं लाविलें । मनुष्याचें मांस चर्म व्यर्थचि गेले । हें निर्गुणा तुवां अनुचित केलें । कारणीं कां न लावसीच ॥३०॥
भाव भक्ति संपूर्ण जयाठायीं । त्यांस तुवां भाग्य कां दिधलें नाहीं । ऐसा हा अपरमार्थ तुझ्या ठायीं । मिथ्या असे ईश्र्वरा ॥३१॥
तुवां एक बरवें केलें दातारा । अढळपदीं तूंचि परमेश्र्वरा । ध्रुवमंडळींहि असे सत्य फेरा । तुजभोंवतीं फिरे ॥३२॥
जैसा तिव्हडेकर बैलाचा फेर । तैसा ध्रुवभक्ताचा असे विचार । सेलेचे बैल तैसे तारांगणें फेर । ईश्र्वरीं प्रदक्षिणा ॥३३॥
ऐसे भक्तराज महा थोरवट । गुप्त होतासी तो केला प्रगट । उपकार न मानिसी ऐसा धीट । दुसरा न देखों बापा ॥३४॥
निर्गुणा चवदा भुवनें तुझ्या कटीं । तो भक्तीं सांठविला हृदयसंपुटीं । आतां हार पत्करी उगा शेवटीं । मजसी पुरी न पडे तुझी ॥३५॥
निर्गुणा भावें करितां तुझें भजन । अंतरीं चुकुर करिसी आम्हांलागुन । ऐसा परमार्थ सगुणपण । नाहीं तुझे ठायीं दातारा ॥३६॥
उदकीं गगन बुडालें देखिलें । वरी न्याहाळितां ठायींच संचले । ऐसे बाहिर अभ्यंतर कळलें । तुझें तुज कृपेनें ॥३७॥
निज प्रेमाचा लांच खरा । अझुनि तरी मज देई ईश्र्वरा । नाहीं तरी उघडीन तुझा पसारा । सद्गुरूच्या आत्मज्ञानें ॥३८॥
लांच घेऊनि तुझा सर्वेसरा । निंदेची स्तुति करीन बरा । कांही उणें पडों नेदी चक्रधरा । निज सेवकपणें ॥३९॥
जमान उभा करी आपणास । माझा जमान सद्गुरु राजस । मग तुझें माझें बोलणें सुरस । ऐकतील साधुजन ॥४०॥
निर्गुणास चवदा भुवनें धांडोळितां । कोणी जमाना न दिसे पुरता । मग शेख महंमदासी जाला बोलता । म्हणे आतां क्षमा करी ॥४१॥
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP