प्रसंग नववा - पतिव्रता
श्री संत शेख महंमद ( १५६०-१६५०) महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील संत होते त्यांचे मुळ गाव श्रीगोंदा, जि अहमदनगर.
शेख महंमदाना महाराष्ट्रात कबीराचा अवतार म्हणून ओळखले जाते.
आतां सांगेन पतिव्रतेचे गुण । शुभ आचार सांगती धांगडीलागून । वाचेस न ये ढवाळीचें वचन । हे पवित्र दीक्षा त्यांची ॥१०१॥
वेश्या बसल्या त्यांचे शेजारीं । त्याहि पवित्र होतील विचारी । तुळसी सडे घालिती द्वारीं । ईश्र्वरीं भजोनियां ॥१०२॥
पतिव्रता शुभाचारें निमाल्या । त्यांच्या नांवे चंचळा विकों लागल्या । कमळजा दमयंती चांगुणा अनुसुया सांगितल्या । दृष्टांतालागी ॥१०३॥
बत्तीस लक्षणीं पतिव्रता पद्मिनी । नरनारायण जोडल्या लागुनी । तेथें मज निपज निर्गुण भजनीं सोऽहं लक्ष लागावी ॥१०४॥
मज ऐसें चिंतिलें पाववी ईश्र्वरा । प्रेमबोधें भजन करीन दातारा । जाळीन अविद्येच्या अनाचारा । सद्गुरु स्वामी सेवूनियां ॥१०५॥
हें इतुकें बोलतां वचनीं । अंतरीं हरुषली कृपा पद्मिनी । म्हणे ऐसा पुत्र व्हावा मजलागुनी । पुढती पुढती उद्वरावया ॥१०६॥
घेऊनि नरा पद्मिनीचा आशिर्वाद । पुढतीं अवतरणीं करी प्रबोध । निर्गुणा नांवें सत् सिद्ध साधे । सगुण स्थूळ धरूनि ॥१०७॥
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP