प्रसंग नववा - चंचल-धांगडी

श्री संत शेख महंमद ( १५६०-१६५०) महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील संत होते त्यांचे मुळ गाव श्रीगोंदा, जि अहमदनगर.
शेख महंमदाना महाराष्ट्रात कबीराचा अवतार म्हणून ओळखले जाते.


तारुण्यांत मोकळी सोडी योनी । वार्धक्‍यीं पतिव्रता शिरोमणी । म्‍हणवितसे बोचरी होउनी । आजी अविचाराची ॥९६॥
तारुण्य देखोनि तळंग्‍या पोरी । सैताडपणें म्‍हणवी म्‍हातारी । झुरळ्या पडोनि दिसे कांबरी । निबर भालू जैसी ॥९७॥
धापा देत बोले म्‍हणवी आवा । तारुण्यीं केला नाहीं पुण्याचा ठेवा । चंचळ आचरली विषयें मावा । गोंवळ्याची म्‍हणउनी ॥९८॥
निबर दिसे अभिलाषी ना कोणी । मग ते होय गरतीची कुंटणी । चकऊनि सुंदरा कामिनी । परपुरुषीं रमवितसे ॥९९॥
ऐशा चंचळा धांगडी जन्मती । आपण चळोनि आणिकां चळविती । हें ऐकूनि कोणी खोडी सांडिती । म्‍हणऊनि बोलिहों ॥१००॥


N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP