प्रसंग पंधरावा - चांद बोधले
श्री संत शेख महंमद ( १५६०-१६५०) महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील संत होते त्यांचे मुळ गाव श्रीगोंदा, जि अहमदनगर.
शेख महंमदाना महाराष्ट्रात कबीराचा अवतार म्हणून ओळखले जाते.
ॐ नमोजी श्रीसद्गुरु चांद बोधले । त्यांनी जानोपंता अंगिकारिलें । जानोबानें एका उपदेशिलें । दास्यत्वगुणें ॥१॥
दास्यत्व फळलें हनुमंतास । तो हृदयीं वागवी रामचंद्रास । जैसा दर्पणांत सर्व भास । अतीत दिसे ॥२॥
दास्यत्व फळलें हनुमंताप्रती । ज्याची रामायणी जगीं कीर्ति । ऐसी पाहिजे भक्ति निरुती । समस्तांलागीं भावें ॥३॥
सत् चांद बांधल्याचे कुळीं शेख । महंमदांनीं चर्चिले विवेक । ते विवंचनेला संत प्रश्र्निक । आशिर्वाद देती ॥४॥
पातशहानें मना केली बगणी । चांद बोधले अजमतेचे धणी । त्यांनी त्याची मना केली हगवणी । हें विश्र्व साक्ष असे ॥५॥
नृपति लागले बोधल्याचे चरणीं । मग त्यानें मोकळी केली हागणी । मग आनंद आला क्षेत्रभुवनीं । दरुषनें पुजिली ॥६॥
हें सांगावया काय कारण । म्हणती शेख महंमदालागून । कोठीले पुसा कोणाचा कोण । यालागीं प्रगटिलें ॥७॥
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP