प्रसंग पंधरावा - वीर
श्री संत शेख महंमद ( १५६०-१६५०) महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील संत होते त्यांचे मुळ गाव श्रीगोंदा, जि अहमदनगर.
शेख महंमदाना महाराष्ट्रात कबीराचा अवतार म्हणून ओळखले जाते.
यावेगळे काढिती वीर । डांका घालिती बोलावूनि कुंभार । पायां पडती लहान थोर । पाखर घाली म्हणती ॥२०॥
निमाल्या चौर्यांशी लागे भोगणें । हें तंव बोलती साधु पुराणें । वीर लागले म्हणती अज्ञानें । वासनेच्या संगें ॥२१॥
वीर लटके तरी कैसे लागले । जैसे वासनेनें राजे दरिद्री केले । तैशी वीर वासना हेतुसंगें लागलें । शंका धरुनियां ॥२२॥
शंका डाकीण मनसा भूत । भय धरितां परतोन लागत । याकारणें उमटों न द्यावे हेत । तर्क कल्पनेचे ॥२३॥
वीर म्हणती वंशी लागले । ज्यांनीं मारिलें त्यांसी कां सत्वें सांडवलें । हे विचार कां कळों नाहीं आले । मनुष्य देह धरितां ॥२४॥
मूळ वीर काढिती अनाचारें । म्हणती बोंबला अंगा आलें वारें । करवली पिटिती आनंदती पोरें । अजापुत्र भक्षावया ॥२५॥
मेले जिताचे देहीं संचरले । तर जिताचे जीव कोणीकडे गेले । भ्रमिष्ठपणें बेंबळीं जावों लागले । उचलोनि घेतले खांद्यावरी ॥२६॥
मग संवदणीपाशीं नेला । पाय घालतां कैसा शुद्धि जाला । हे साक्ष प्रचीतीनें तुम्ही बोला । वीर भूतांचे पूजारी हो ॥२७॥
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP