प्रसंग पंधरावा - अन्नार्थी देवकरांनीं केलेलें पाखांड
श्री संत शेख महंमद ( १५६०-१६५०) महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील संत होते त्यांचे मुळ गाव श्रीगोंदा, जि अहमदनगर.
शेख महंमदाना महाराष्ट्रात कबीराचा अवतार म्हणून ओळखले जाते.
साधुत्वावेगळें जें आचरण । तें पाखांड जाणा संपूर्ण । देवकारां मिळों लागलें अन्न । अन्नार्थे ग्वाही देती ॥२८॥
चोराची शिंदळ ग्वाही देते । खरें न म्हणती प्रश्र्निक जाणते । तैसें साधू न म्हणती हीनातें । पवित्रा मुखें ॥२९॥
असत्य जति गाइली कुंभारें । अवतरोन बोले घुमारें । म्हणें मज मारिलें होतें चोरें । तुझ्या पोटास आलों असे ॥३०॥
Last Updated : November 11, 2016
TOP