माला १०१ ते १५०
श्री. प. प.वासुदेवानन्दसरस्वतीकृत दत्तमालावर्णांकितमाघमाहात्म्य
दा नें देती यथाशक्ती । ग्रीष्मी प्रपा स्थापिती ।
हेमंती काष्ठ कंबळें देती । विश्रांति करविती वर्षाकाळीं ॥१॥
य ज्ञदानादिक धर्म । किंवा करणें सत्कर्म ।
याच द्विपीं घडे उत्तम । अन्यत्र शर्म भोगणें ॥२॥
क्रों चादि द्वीपें असती । तेथें कर्मे न घडती ।
जंबुद्बिपीं पुण्यें होती । आर्यावर्ती विशेष ॥३॥
अ सें जाणुनी सादर । नित्यकर्म करी नर ।
पापें वारूनी सत्वर । जायी पार भवाब्धीच्या ॥४॥
सा दरें करी प्रात:स्नान । यथाकाळीं संध्यावंदन ।
पंचयज्ञ आचरोन । राहे तो न बद्ध होय ॥५॥
ध्या नीं धरी विष्णूसी । कर्में करी निराशी ।
मुक्ती त्याचि होयि दासी । सिद्धी त्यापासी रांगती ॥६॥
कर् माकर्म विकर्म । जाणावें ह्याचें वर्म ।
तोचि सनातन धर्म । शर्म घडे त्यायोगें ॥७॥
ष ट्शास्त्रेंही जाणिली । परि कर्माची हे किल्ली ।
जंववरी हातीं न आली । तंव शिणविलीं त्रिकरणें ॥८॥
णा डिती पक्ष करूनी । अन्या ठेविती अडवुनी ।
ते जातील निर्वाणीं । हे कहाणीं नायकावी ॥९॥
य थोक्त कर्मे करून । जे करिती ईश्वरार्पण ।
दंभासूयादि सोडून । तेची जाण मोक्षभागी ॥११०॥
ऐं द्रीपासूनी अष्ट दिशा । तीर्थें हिंडतां न दुर्दशा ।
दुरावे धरितां फलाशा । ईशानुग्रहावांचुनी ॥११॥
चाक् पटुत्व बुद्धिकौशल । असे जरी विद्याबल ।
तरीं अज्ञानाचें मूल । नरा निर्मूल न करवे ॥१२॥
प्र त्यक्षादि प्रमाणानें । न मिळे तें स्वधर्मानें ।
लाभे बुद्धिशुद्धीनें । वेदवचनें विश्वासितां ॥१३॥
दा वी गुरु शास्त्राधारें । तें श्रद्धेनें जो आचरे ।
तो नर भवाब्धी तरे । हेंची खरें मुख्य वर्म ॥१४॥
य ज्ञ पूर्तष्टदान । जपतपानुष्ठान ।
सफळ होय भाविकां जाण । गुरुवचन पाळितां ॥१५॥
क्लीं कारादि बीजें योजून । मोहनादिप्रयोगाचरण ।
करविती कर्म दारुण । गुरु कोण म्हणेल ते ॥१६॥
ज नदु:खें कळवळे । ज्याचें चित्त स्वयें वळे ।
दीना तारी निजबळें । उपदेश फळे तयाचा ॥१७॥
ग रज नाहीं स्वार्थीं ज्याला । सांगेना कां सकामाला ।
त्याचा उपदेश भला । तो लोकांला तारील ॥१८॥
त्र यिमूर्ति तो मानुन । पाळितां त्याचें वचन ।
उद्धरती हीन दीन । सत्य जाण त्रिवाचा ॥१९॥
य त्नें पाप वर्जावें । घडतां प्रायश्चित्त करावें ।
नित्य हरीतें स्मरावें । पाप दुरावे तयाचें ॥१२०॥
व श्य करी इंद्रियांसी । सोडुनी दे परान्नासी ।
माता मानी परस्त्रीसी । खास त्यासी श्रेय ये॥२१॥
शी तोष्णादि साहुनीं । भावें वागे सदाचरणीं ।
परनिंदा न घे कानीं । तो तरोनी तारी परा ॥२२॥
क र्म न फळे स्नानाविणें । अस्नाताच्या वीक्षणें ।
देव फिरती मागें क्षणें । त्याचें जिणें शववत् ॥२३॥
र जस्वल स्नानाविणें । म्हणोनी तें नित्य करणें ।
मात्र मानसस्नानें । रोग्याकारणें योजिलीं ॥२४॥
णा डी लोकां पाखंडपणें । खायी पियी स्नानाविणें ।
तो नर नरकीं शिणें । यमभेणें ये तया ॥२५॥
य म न करी पाप्याची दया । अपराध क्षमा नसे जया ।
नृदेहीं धरितां हरिच्या पायां । यम तया काय करी ॥२६॥
सौ ष्टवें हरिचें नाम । वेदसेवा तीर्थधाम ।
धर्म करी निष्काम । परंधाम त्या लाभे ॥२७॥
सर् वांहुनी अन्नदान । श्रेष्ठ न ज्या काळ मान ।
बुभुक्षित पात्र जाण । हें तारण उभयत्र ॥२८॥
व से गृहस्थ होवुन । त्याणें द्यावें शक्त्या अन्न ।
यती वर्णी ब्राह्मण । विमुख होतां जाण दुर्गती ॥२९॥
म ध्यान्ही ये भुकेला । न देतां दवडी त्याला ।
त्याचे गेहीं अवदशेला । थारा झाला शाश्वत ॥१३०॥
न: ष्ट दुष्ट न म्हणावा । यथाशक्ती तोषवावा ।
अतिथीप्रसादें ये देवा । दया भावार्थि याची ॥३१॥
क्षो भवितां अतिथीसी । देव पितर तयासी ।
शापिती तो कष्टेंसी । नरकवासी होतसे ॥३२॥
भ वभय टाळावया । गंगातीर सेवी तया ।
गती ये हें न घडे जया । नामही तया तारीतसे ॥३३॥
णा ठवी जो चित्तीं पाप । लोकां न दे शाप ताप ।
त्याच्या पुण्या नाहीं माप । त्याचा कोप उपशमे ॥३४॥
य त्नें तीर्थवास कीजे । प्रतिग्रह न धेइजे ।
अन्यपाप क्षेत्रीं बारिजे । वज्रलेप जें क्षेत्रपाप ॥३५॥
श्रीं गितज्ञाची भक्ती थोर । सौख्य दे जी इहपर ।
साधू होती दुष्ट क्रूर । ईणें पामर तरले ॥३६॥
म हामृत्यू अजामिळा । आला फांस घाली गळां ।
नारायणा निजबाळा । बाहे त्या वेळां हरी ये ॥३७॥
हा क दिल्ही नारायणा । त्या अंतरीं पुत्रपणा ।
ब्रीद राखाया नारायणा । दया ये शरणागताची ॥३८॥
सं ज्ञा पुत्रासी योजिली । तीच दैवें अंतकालीं ।
वैखरीनें उच्चारिली । ती झाली तारक ॥३९॥
पत् ता ज्याचा योग्या नसे । स्वनामें तो भेटतसे ।
विवक्षा न पाहतसे । औदार्य असें जयाचें ॥१४०॥
प्र यत्नें न घेतां नामा । पापी गेला परंधामा ।
घेती ठेवूनी जे प्रेमा । हरि नामातें बुडती कीं ॥४१॥
दा स होवूनी विष्णूचे । नाम घेती फुका वाचे ।
अर्चन करिती शालग्रामाचें । स्थान त्याचें वैकुंठीं ॥४२॥
य ज्ञादिकें पुनरावृत्ती । जन्मक्लेश न चुकती ।
शालग्रामर्चनें मुक्ती । वैकुंठासी निश्चल ॥४३॥
ग्लौं बीजयुक्तोपासना । करितां कष्टें मिळे त्यांना ।
भूमिलाभ नश्वर जाणा । अन्य कामना न पुरती ॥४४॥
भू ति निधी संतती । एकैक मंत्रें मिळती ।
त्यांची नसे शाश्वती । दैवगती अतर्क्य ॥४५॥
मं त्र तंत्रादि फळती । तीं फळें नश्वर होती ।
शालग्राम इष्ट प्राप्ती । दे सन्मती ठेवितां ॥४६॥
ड सूं येतां महाकाळ । त्याचें हरावया बळ ।
शालग्रामार्चन सबळ । चित्ता निश्चळ करी जें ॥४७॥
ला भे गुरुप्रसादें जी । विष्णुभावें तिला पूजी ।
त्याला गती न ये दुजी । वैष्णवांमाजीं श्रेष्ठ तो ॥४८॥
धि क्कार असो तयाला । विके जो शालग्रामाला ।
दान देतां भूदानफलाला । दे जी तिला कोण दवडी ॥४९॥
प य आदिकीं अभिषेक । करोनी पीतां तीर्थोदक ।
त्याचें जाय सर्व पातक । चक्रांकयोगें विशेष ॥१५०॥
N/A
References : N/A
Last Updated : May 23, 2016
TOP