माला १५१ ते २००

श्री. प. प.वासुदेवानन्दसरस्वतीकृत दत्तमालावर्णांकितमाघमाहात्म्य


त्य  जा विषमचक्रां । शालग्राम सम सुमुख ।
अथवा पूजावा एक । दोन ऐक न पूजावे ॥५१॥
प्र  सन्न होय श्रीहरी । शालग्रामर्चनें तारी ।
एकादशी व्रत करी । तोही हरिवल्लभ ॥५२॥
दा  न यज्ञ तपाहुन । एकादशी व्रत जाण ।
उपवासें करी पावन । पाप जाळून मानवां ॥५३॥
य  त्नें कीजे निराहार । किंवा करूनी फलाहार ।
रात्रौ भजनें जागर । करितां नर पावन ॥५४॥
द्रां  बीजयुक्तोपासनें । चिरंजीवित्व मात्र होणें ।
तेही देवूनी भवभेणें । हरी उपोषणें एकादशी ॥५५॥
चि  त्तीं ठेवूनी हरीस । एकाहार एकादशीस ।
एकादशीचा उपवास । द्वादशीस पारणा ॥५६॥
रं  गी हरिभजनीं नर । दोन्ही एकादशी सादर ।
करी त्याचे वैकुंठपूर । दामोदरप्रसादें ॥५७॥
जी  वां विषय सर्वंत्र । अन्यत्र मिळे भोगमात्र ।
येथेंची नर ज्ञानपात्र । होतां पवित्र मोक्ष घे ॥५८॥
वि  वश न कीजे इंद्रियगण । द्यावें सर्वां अभयदान ।
आपुलें चित्त शोधुन  द्रोहवर्जन करावें ॥५९॥
ने  में पाप वारुन । वदावें सत्य वचन ।
परस्व न घ्यावें चोरून । विषय सेवन सोडावें ॥१६०॥
व  सती कीजे सज्जनीं । पीडितांही दुर्जनीं ।
विवेक शांति घ्यावी मनीं । संतोषोनी दैवलाभें ॥६१॥
षट्  शत्रू जरीं उठती । त्यांची कीजे उलट गती ।
चित्तीं चिंतावा श्रीपति । सन्मती राखावी ॥६२॥
व  दोनी वाचे तन्नाम । करी ऐसा स्वधर्म ।
त्याचें कर्म होय अकर्म । जें दे शर्म इहपर ॥६३॥
शी   ण मनी न आणितां । असा धर्म आचरतां ।
केवीं न ये मुक्तता । धरितां सत्यता शास्त्रार्थीं ॥६४॥
कु  शल कर्मीं हर्षति । अकुशला द्वेषिती ।
त्यांला कैंची ऊर्ध्वगती । ते दुर्मती जाणावे ॥६५॥
रु  द्रोपेंद्रादि देवता । ऐसा धर्म आचरतां ।
तुष्ट होती हें तूं आतां । अनुभविलें ताता विकुंडला ॥६६॥
व  चन दूतांचें हें ऐकुन । विकुंडल धरी चरण ।
केलें धर्म निरूपण । धालें मन परिसतां ॥६७॥
शी  त होयी अग्नी सूर्य । ऐसें संतां अंगीं वीर्य ।
तुम्हीं चतुर आर्य । एक कार्य करावें ॥६८॥
कु  त्सित हा माझा भ्राता । नरकांतूनी ये वरता ।
ऐसा उपाय करा आतां । असाध्य संता नसेची ॥६९॥
रु  दित जो माझ्याविरहें । यमयातना न साहे ।
त्या वांचुनी सुख मी हें  । न पाहें सर्वथा ॥१७०॥
वौ  ढाळ जरी आपुला । न सोडवे तयाला ।
हें कठिण तुम्हाला । नसे मला वाटतें ॥७१॥
षट्  शास्त्री जें नेणती । संत तेंची जाणती ।
म्हणोनी करितों प्रणती । द्यावी गति बंधूला ॥७२॥
डा  कू चाड लबाड । लांडी करी जरी द्वाड ।
तरीं तो उद्धरा म्हणोनि आड । पडला भीड घालुनी ॥७३॥
कर्  म खोटें श्रीकुंडलाचें । तरीं मन वळे दूतांचें ।
म्हणती आठव्या जन्माचें । पुण्य साचें तुझें असे ॥७४॥
ष  डंग वेद निपुण । तूं होतास ब्राह्मण ।
मत्स्यदेशीं तुझें स्थान । तेथें ब्राह्मण चार आले ॥७५॥
या  शीक शाकल मुनी । त्याचे पुत्र ब्रह्मज्ञानी ।
विधिनिषेधा उलंडुनी । फिरती सोडुनी देहभान ॥७६॥
कर्  नृत्वादि नसे ज्यांला । तूं त्या दिगंबरांला ।
गेहीं आणूनी भला । सन्मान केला भावार्थें ॥७७॥
ष  ड्रिपू ज्यां न शिवती । चिदन्वयें विश्व पाहती ।
तत्सेवापुण्यमिती । करूं न सकती कोणीही ॥७८॥
य  त्न न होतां सत्संगति । एक दिन घडली होती ।
त्या पुण्याची नसे मिती । अगम्य गती ये ज्या योगें ॥७९॥
हुं  तुंकारें गुरूला । अवमानितां ये तुला ।
सहा जन्म भोग सरला । हा लाधला देह मग ॥१८०॥
वि  षयकर्दमीं येथें ही । रुततां वर येसी तेंही ।
ज्ञानिसेवा फल पाहीं । संदेह नाहीं यामध्यें ॥८१॥
द्वे  षरागादि जावून । माघस्नानें तूं पावन ।
होवुन घेतलें साधून । उत्तम स्थान धन्यारे ॥८२॥
ष  ड्रिपुग्रस्त बंधु तुजा । नेणें शुभाशुभ काजा ।
त्याची नसे पुण्यपुंजा । त्या दे तुझ्या पुण्यातें ॥८३॥
य  मापाशीं त्वां जावें । तेंची पुण्य वोपावें ।
त्याणें तुझा बंधू पावे । वैकुंठी जवें करी हें ॥८४॥
वि  कुंडल हें ऐकून । तसें करे पुण्यदान ।
तेणें बंधूला सोडवून । विमानासन्न आणिला ॥८५॥
द्वे  ष मत्सरादि जावून । त्या पुण्यें शुद्ध होवुन ।
भ्रात्यासह यानीं बैसोन । विष्णुभवना पातला ॥८६॥
ष  डिंद्रियें जिंकिती । त्यांला दुर्लभ जी गती ।
दूतसंगे वैश्या ये ती । सत्संगती तारी असी ॥८७॥
य  त्न न होतां केवळ । तारी ऐसें धर्मबळ ।
देहलोभें काय फळ । खायी काळ अंतीं ज्याला ॥८८॥
फट्  कारूनी लोभातें । आचरितां धर्मातें ।
नर पावे मुक्तितें । अर्जुनातें म्हणे दत्त ॥८९॥
उ  च्च नीच नसे देवा । तो पाहुनी भक्तिभावा ।
देतो आनंदाचा ठेवा । करी भवाब्धीपार ॥१९०॥
चा  तुर्य जेथें न चले । जेथें तार्किक भागले ।
योगीश्वरही ठकले । तें पद लाधलें भाविका ॥९१॥
ट  पती अर्थी स्वार्थाला । तसे सिद्ध टपती ज्यालां ।
कष्ठ होती तयांला । भाविकांला तें सहज हो ॥९२॥
यो  द्धा लक्ष्या लक्षी जेवीं । योगी चित्त ठेवी तेवी ।
त्याल जी पदवी । दवीयसी होतसे ॥९३॥
चा  ड त्याची न धरितां । सदाचारें येती हाता ।
तेव्हां ऐसें आचरतां । मुक्तता ये जनासी ॥९४॥
ट  ळू न देतां काळ । माघस्नान करिती ते सकळ ।
पूजा होम श्रवणीं वेळ । नेती मळ गळे त्यांचा ॥९५॥
य  त्नें व्रतस्य राहती । जरीं ते कामना धरिती ।
नित्य महात्म्यें ऐकिती । पालटे मती आपोआप ॥९६॥
ठ:   स्का लागतांही विवश । नाम घेतांही तुटे पाश ।
मग स्वस्थ घेती निराश । त्यांचा नाश होय कीं ॥९७॥
ठ:   स्का लागतां बडबडे । नामोच्चार दैवें घडे ।
तो पडे भवाचे कडे । तेथें नडे कीं सावधान ॥९८॥
स्तं  भित होती जेथें श्रुति । म्हणोनियां नेति नेति ।
त्या पदाची प्राप्ति । या रीती होतसे ॥९९॥
भ  क्ति श्रद्धा ध्यान । याहें घडे आत्मज्ञान ।
त्यांत भक्ती ये घडोन । धर्माचरण करितां ॥२००॥

N/A

References : N/A
Last Updated : May 23, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP