माला ३०१ ते ३४३
श्री. प. प.वासुदेवानन्दसरस्वतीकृत दत्तमालावर्णांकितमाघमाहात्म्य
सर् वतीर्थामध्यें थोर । गंगा तीहुनी काशीनगर ।
जेथें तारी विश्वेश्वर । हा निर्धार सत्यची ॥१॥
व से ताराया ह्या लोकांला । संगें अन्नपूर्णेला ।
घेवोनी परिवाराला । म्हणती ज्याला विश्वेश ॥२॥
मं त्र तारक कानीं । सांगे मरतांची प्राणी ।
नेयी त्याला उद्धरोनी । तो भवानीनायक ॥३॥
त्र यमूर्ति पाप्यास । उपदेशें तारी खास ।
करोनी जे क्षेत्रवास । करिती खास पातकें ॥४॥
स्व यें भैरवाकरवीं । त्यांला यातना भोगवी ।
भोगें पातक संपवी । मग दे पदवी तयाला ॥५॥
रू ढयोगा दे सायुज्य । अन्य धन्या करी पूज्य ।
कैलासी ने तेथें प्राज्य । सौख्य होय निश्चित ॥६॥
पा प काशीमध्यें ज्याणें । केलें त्याला हें भोगणें ।
कल्पित योनी भोगूनी त्याणें । मोक्ष घेणें निश्चित ॥७॥
य मदूत जेथ न येती । भैरव यातना देती ।
परी अंतीं गती ये ती । क्षेत्रमृती असी असे ॥८॥
सर् व पाप जातां तूझें । दर्शन हें झालें माझें ।
आतां कष्ट तुझे विझे । देतें माझें थोडें पुण्य ॥९॥
व सोनी मी कैलासीं । प्रतिवर्षीं माघमासीं ।
करीं स्नान प्रयागासी । पुण्यराशी जोडिले असे ॥३१०॥
यं नाम तीर्थराज । स्नानें क्षाळी पापपुंज ।
जेणें तारिलें मज । करविलें अजदर्शन ॥११॥
त्र यमूर्ती तो माझा देव । पुरवी भक्तांचा भाव ।
निजपदीं देयी ठाव । तो हा तव तारक ॥१२॥
स्व रूप चिंतुनी त्याचें । एक माघस्नानाचें ।
फळ देयीं तुला साचें । सद्गतीचें दायक जें ॥१३॥
रू प शिवाचें चिंतून । अप्सरा ती हर्षून ।
पिळूनी आर्द्रवसन । करीं जीवन घेतसे ॥१४॥
पा णी हातीं घेवून । म्हणे एक माघपुण्य ।
तुला म्यां दिल्हें दान । म्हणोनी जीवन सोडिलें ॥१५॥
य द्रूप अति कराल । होतें परंतू तीणें जल ।
सोडितां तो तत्काळ । शोभे विमल राक्षस ॥१६॥
सर् व क्रूरभाव त्याचे । पालटोनी शांततेचें ।
पात्र झाला तो हें पुण्याचें । फळ वाचे न वर्णवे ॥१७॥
व दे वंदूनी अप्सरेला । माये उद्धरिलें मला ।
न विसरें उपकाराला । प्रत्युपकाराला काय देवूं ॥१८॥
तं त्र मंत्रादि साधन । संतांपुढें जाती लपोन ।
ज्यावरी करिती नयन । तो पावन होतसे ॥१९॥
त्र्य यी धर्मादि साधनें । फलद होती कालानें ।
तत्काल संतदर्शनें । फल दानें देतात ॥३२०॥
स्व यें तरोनी तारिती । संतांच्या ह्या विभूती ।
लोककल्याणार्थ वांचिती । ज्या फळती नमस्कारें ॥२१॥
रू प संतांचें अलौकिक । वसे जेथें नित्य विवेक ।
त्यांपुढें बापुडें पातक । शोक धाक कायसे ॥२२॥
पा पी मी हो महाक्रूर । माझा केला त्वां उद्धार ।
तुला प्रसन्न शंकर । असो धरसुताही ॥२३॥
य त्प्रसादें तूं धन्य । अससी लोकमान्या ।
तो ताराया अन्या । करो वदान्या नित्य तुला ॥२४॥
सर् वत्र जें दिसे मज । अनित्य वाटे तें आज ।
आतां मातें ज्ञान पाज । अन्य काज न उरलें ॥२५॥
व दें निश्चय करून । इहपर भोग साधन ।
तें मानी श्ववमन । विटे मन तेथें आतां ॥२६॥
पल् लवूनी वदूं किती । त्वद्दर्शनें शांति दांती ।
समाधान उपरती । लाधली क्षांती पूर्णत्वें ॥२७॥
ल क्ष्य लावूनी श्रद्दायुक्त । उपदेश श्रवणीं सक्त ।
झालों आतां करीं व्यक्त । प्रबोध मुक्त करी जो ॥२८॥
व सें दैवे कोठेंतरीं । पुन: ऐसें न करीं ।
ऐसा धर्म सुंदरी । सांगें वारी जो आवृत्ती ॥२९॥
स्व भाव जाणूनी त्याचा । मग अप्सरा बोले वाचा ।
हा देह देवयोनीचा । झाला साचा तुझारे ॥३३०॥
रू पें देव तूं खास । नरधर्मीं नहो वास ।
नर जे दैवी संपत्तीस । धरिती त्यांस मोक्ष ये ॥३१॥
पा वले देव जयासी । स्वसंपत्तीनें दैत्यांसी ।
आसुरी संपत्ती ग्रासी । मोक्ष त्यांसी दुर्लभ ॥३२॥
य मेंद्राश्विवरुणादि । पद पावले अनादि ।
तूंही जावया त्या पदीं । वागीं मदीयोक्तधर्में ॥३३॥
ॐ कारवाच्य जो देव । त्याच्या पदीं ठेवीं भाव ।
त्याला समर्पूनी सर्व । वायां गर्व न करीं ॥३४॥
न म्र होई सर्व भूतां । दैवी संपत्ती तत्वता ।
राखें शोधीं निजचित्ता । ब्रह्मसत्ता लक्ष्यीं धरीं ॥३५॥
मो चन करीं हिंसेला । न वदें परदोषाला ।
सद्धृतीमतीनें मनाला । आवरी कामाला वारूनी ॥३६॥
म हादेवा भजें नित्य । दृश्य हें पाहें असत्य ।
प्रवाहपतितकृत्य । करीं अहंता सोडुनी ॥३७॥
हा ची तुला उपदेश । चिदन्वयें देखें विश्वास ।
जीवन्मुक्ति दशेस । जासी खास समत्वें ॥३८॥
सि द्धीलागीं न भुलतां । असा नित्य वागतां ।
जीवन्मुक्ती तत्वतां । मिळोनी विदेहता मिळेल ॥३९॥
घा म लाधलें त्याला खास । विमान आलें सूर्यसंकाश ।
राक्षस वंदूनी तीस । गेला स्वर्गास पुण्य भूं ॥३४०॥
य त्नाविना मुक्ति देवुनी । अप्सरा गेली शिवभुवनीं ।
अर्जुना म्हणे श्रीदत्तमुनी । माघस्नानी फळ हें ॥४१॥
स्वा शय हा ठेवुनी । जनांला फल दावुनी ।
वेद तारी असें ऐकुनी । अर्जुन मनीं आनंदला ॥४२॥
हा श्रीदत्तार्जुन संवाद । माघमाहात्म्यमिषें विषद ।
हो हा हरी जीवात्म भेद । अखेर पद दे ध्रु ॥४३॥
श्रीगोविंदकृपापूर्णा वासुदेवसरस्वती । मृगार्के नर्मदातीरे तीर्थराज इवोद्गता ॥१॥
इति श्रीदत्तात्रेयाsर्जुनसंवादे मकरार्कमाघमाहात्म्यं संपूर्णं ॥ श्रीदत्तात्रेयार्पणमस्तु ॥
N/A
References : N/A
Last Updated : May 23, 2016
TOP