माला २०१ ते २५०

श्री. प. प.वासुदेवानन्दसरस्वतीकृत दत्तमालावर्णांकितमाघमाहात्म्य


य  थार्थ होतां आचरण । शुद्ध होय अंत:करण ।
मग सहजची ध्यान । लागे जाण अर्जुना ॥१॥
स्तं  भाधार जेवीं घर । तेवीं ज्ञान भक्त्याधार ।
परभक्ती ज्ञानोत्तर । जे ईश्वरानुरक्ति ॥२॥
भ  क्ती ज्ञानाची जननी । ती मिळे सदाचरणीं ।
तेव्हां ही लोकां करणी । होय तारिणी जाणावी ॥३॥
य  मादि योग सत्कार । कारण असे साचार ।
तप श्रद्धा त्यांत थोर । योगिवर मानिती ॥४॥
खें  चावया इंद्रियां । मन हेतू होय तया ।
बुद्धी खेंचे तिला राया । सत्वशुद्धी पाहिजे ॥५॥
खें   म देतां सत्वें धीला । आत्मा स्वयें दिसे भला ।
आचार हा सत्वाला । शोधक योजिला श्रुतीनें ॥६॥
मा  घस्नान तुच्छ साधन । असें न मानो तुझें मन ।
हें ध्यानीं आणोन । पाहें भ्रमण न ये रे ॥७॥
र  चना वेदाची अचाट । अधिकारें दावी वाट ।
भाविक तेणें जाती नीट । जे धीट ते तरती ॥८॥
य  त्नें आणि मार्गावर । वेद हा दयापर ।
दोषारोप त्यावर । करतां नर न तरती ॥९॥
मा  घस्नानपुण्यें एक । ब्रह्मराक्षस तरला ऐक ।
माघस्नान अपसरा सुरेख । करी एकभक्तीनें ॥२१०॥
र  मणी सर्वकलापूर्ण । कैलासी जीचें स्नान ।
उमेची सखी होवून । शिवार्जन नित्य करी ॥११॥
य  त्नें प्रतिवर्षें ती । माघस्नानीं धरी प्रीती ।
अर्धोदयीं आप्लुती । प्रयागीं ती करितसे ॥१२॥
न  टळे तीचा कधीं काळ । होतां नित्य उष:काळ ।
प्रयागीं ये चपळ । योगबळ असे जीला ॥१३॥
म:  स्तकीं अंजुली बांधून । करी शंकरा नमन ।
यथाविधी माघस्नान । करी मन लावुनी ॥१४॥
सं  कल्प ईशप्रीत्यर्थ । याहुनी नसे अन्यार्थ ।
मग ती देहाचा स्वार्थ । प्राज्ञी किमर्थ राखील ॥१५॥
पं  नग भूषणें न्हाणाया । जल घेवुन चाले तया ।
गायी चित्त लावुनियां । भवभया वारी जो ॥१६॥
न  पाहे ती इतस्तत: । ऐसें नित्य आचरत ।
एके दिनीं मार्गांत । देखे अकस्मात राक्षसा ॥१७॥
य  क्षादिक ज्याला भीती । हिमाचलीं करी वस्ती ।
त्याची पाहतां आकृती । प्राण होती कंठगत ॥१८॥
सं  निध येतां तीचा । तुषार पडला आर्द्रवस्त्राचा ।
क्रूरभाव राक्षसाचा । गेला पुण्याचा प्रभावें ॥१९॥
पं  न जलकणयोगें । पूर्वस्मृती झाली वेगें ।
नमूनी म्हणे कोणगे । आकाशमार्गें जासी तूं ॥२२०॥
न  मितों तुझे चरण । जासी कोठें तूं कोण ।
कोठून तुझें आगमन । निवेदन करीं हें ॥२१॥
य  क्षिणी किंवा योगिनी । किंवा क्षिराब्धिनंदिनी ।
वाटे तूं होसी भवानी । माझ्या कानीं दे वार्ता ॥२२॥
स्वा  गम तुझें रूप । लावण्यतेजें त्वद्रूप ।
स्फुरे तेणें माझें दूर । होईजे अज्ञानांध ॥२३॥
हा  मी ब्रह्मराक्षस । नित्य करीं येथें वास ।
कोणी न येती आसपास । करी ग्रास म्हणोनी ॥२४॥
पो  ट माझें सदां रितें । खातां गजादि जीवातें ।
कधीं न जाणें तृप्तीतें । आज मातें शांत केलें ॥२५॥
ष  डरी नित्य खवळती । कधीं न ये स्वस्थ स्थिती ।
ऐसी माझी दुर्गती । आज ती पालटली ॥२६॥
य  त्न न होतां दर्शन । झालें मला दैवें जाण ।
करीं माझें उद्धरण । बहु शीण पावलों ॥२७॥
पो  र जेवीं मातेपुढें । आळ घेवोनी आड पडे ।
तैसा मी हा तुझ्यापुढें । आड पडे मातोश्री ॥२८॥
ष  डिंद्रियें मी पाहिलीं । क्षणमात्रही नावरलीं ।
पापकर्में म्यां केली । गती आली हे त्याची ॥२९॥
य  ज्ञादिक नाहीं केलें । परी क्षेत्रवासपुण्य भलें ।
सहजची होतें घडलें । फल आलें तें आजी ॥२३०॥
प  रिसोनी त्याचें वचन । म्हणे अप्सरा करीं श्रवण ।
तूं म्हणसी मी कोण । अप्सरा जाण निश्चयें ॥३१॥
र  हाणें माझें कैलासीं । मी असें उमेची दासी ।
पूजीं नित्य शिवासी । मकरार्क माघमासीं विशेष ॥३२॥
मं  न्नाम कांचनमालिनी । प्रयागीं स्नान करूनी ।
आल्यें जात्यें शिवभवनीं । अर्चीं भवानीपतीला ॥३३॥
त्र  यिमूर्तिच्या प्रसादें । सर्वत्र फिरें स्वच्छंदें ।
राहें नित्य परानंदें । नसे संदेह मच्चितीं ॥३४॥
प  रम हा माघमास । सांप्रत चाले जो जनास ।
स्नानें तारी आणिकास । नसे खास हे शक्ती ॥३५॥
र  विमंडलार्धोदयीं । स्नानाकरितां शीघ्र जायीं ।
त्रिवेणी जल न्हेयीं । शिवपायीं अभिषेकीं ॥३६॥
यं  नामें पापी तरती । त्याची जडली मला भक्ती ।
तेणें सर्वही मानिती । पूर्वस्थिती ऐक माझी ॥३७॥
त्र  पाहीन वेश्याजाती । तेथें माझी उत्पत्ती ।
रूप लावण्य संपत्ती । मीच होती कलिंगीं ॥३८॥
प  राक्रमी कलिंगेश । तो भुलोनी झाला वश ।
त्याचे लुटिले सर्व कोश । केला दास त्याला मी ॥३९॥
र  डती त्याच्या अंगना । त्यांला न घडवी राजदर्शना ।
इतरांही धनिकजना । ठकवीं नाना प्रयत्नें ॥२४०॥
तं  टा लावीं परस्परां । कपटें विश्वास दावीं जारां ।
असे सेवीं अनंत नरां । दुराचारा करूनी ॥४१॥
त्रा  स न ये पापाचा । परिणाम हा अविचाराचा ।
मातेरा नरदेहाचा । केला भोगाचा ल्हावानें ॥४२॥
णि  क्कींहिं जे समजती । परी तेही न उमजती ।
कामाची न करवे शांती । भोगासक्ती करूनी ॥४३॥
छिं  न भिन्न करी यम । हें जाणें बुद्धस्तोम ।
त्यालाही नावरे काम । तेथें नाम काय माझें ॥४४॥
धि  कारीं संतां महंतां । दुराचार नाणी चित्ता ।
मांस मद्य खातां पितां । तारुण्यसरिता आटली ॥४५॥
छिं  न करी यम पाप्यांसी । हें दैवे पाघमासीं ।
माहात्म्य ऐकतां कर्णासी । झोंबले मानसीं विरत्की ये ॥४६॥
धि  क्कारीं हीन कुलासी । तेवीच जार भोगांसी ।
पुढें माझी गती कैसी । होईल ऐसी अनुतापें ॥४७॥
ग्र  स्त होवूनी मोहग्रहें । केलें जें जें पाप हें ।
सांचविलें द्रव्य व्यर्थ हें । बरवा नोहे परिणाम ॥४८॥
हान्  याय कीं अन्याय । न विचारीं अपाय उपाय ।
न धरिली बरवी सोय । आतां हृदय संतापे ॥४९॥
नि  त्य मानीं भोग गोड । अविवेकीं हें चर्मकुंड ।
विकूनी पाप उदंड । केलें यमदंड भोगाया ॥२५०॥

N/A

References : N/A
Last Updated : May 23, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP