राग - सारंग

तव पदी देवा हे अंतीम मागणं ॥
करू नको परस्वाधीन मम जीणं ॥धृ॥
जोवरी अंगी शक्ती हातपाय चलन ॥
तोवरीच योग्य राही सुखी हे जीवन ॥१॥
तुझे नाम देवा अखंड घेता मुखानं ॥
बुद्धीसी ये चलना तुझे करण्या भजन ॥२॥
शरीर हे नसावे व्यापलें रोगानं ॥
तरीच शांत राहील हे चंचल मन ॥३॥
स्वस्थ चित्त होता मग लागेल ध्यान ॥
शामसुंदर कृष्ण प्रभूचे होईल दर्शन ॥४॥
आनंदमय होईल मग हे जीवन ॥
श्री पद कमली दासीचें साष्टांग नमन ॥५॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP