अभंग ३
श्रीमंत पुतळाराजे डॉवेजर राणीसाहेब रचित त्रयोदश अभंगमाला.
राग- भैरवी
[ पंढरी ४ ]
आतां वयोमान झाले बहुत ॥
देवा पाहू नको मम अंत ॥धृ॥
शक्तीहीन झालीसे गत ॥
दृष्टी चालली मंदावत ॥१॥
नसे त्राण उरले शरीरांत ॥
तेणे अंतर पडे तुझ्या सेवेत ॥२॥
मग जिवासी दु:ख बहु होत ॥
जोवरी प्राण असे या देहात ॥३॥
अंतर न पडावा तव सेवेंत ॥
इतुकेच दासी पदीं विनवीत ॥४॥
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP