अभंग ७
श्रीमंत पुतळाराजे डॉवेजर राणीसाहेब रचित त्रयोदश अभंगमाला.
राग - भैरवी
ही भोळी भाबडी भाविक सेवा ॥
तुम्ही गोड मानुनी घ्यावी देवा ॥धृ॥
बालकाचे लाडीक बोबडे बोल ॥
माता - पित्यांना वाटे गोड ॥१॥
तैसे तुम्ही थोर संतसज्जन ॥
गोड करुनी घ्यावी ही विनवण ॥२॥
मी नसे लेखिका अथवा विद्वान ॥
परी हरीच्या उत्कट प्रेम भावनेनं ॥३॥
गुरु कृपेने जे सुचले विचार ॥
तेची पद्यरूपे लिहिले साचार ॥४॥
ही त्रयोदश अभंग माला ॥
दासी अर्पी श्रीकृष्ण पदकमला ॥५॥
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP