श्रीकल्याणकृत पदें - स्फुट पदें
ऐतिहासिक पुराव्यांनुसार, समर्थ रामदासांनी रचलेल्या दासबोध या ग्रंथाचे लेखनिक कल्याणस्वामी होते.
१. ( राग - कल्याण; ताल - दादरा )
साधवपायीं । रत कांही साधका ॥ध्रु.॥
निर्विकारी देव मोठा । त्याची प्रतिमा नाहीं उपमा । साधुरूप पाहीं रत कांहीं. ॥१॥
मायातीत तूं ब्रह्ममूर्ति । आशारहितु पाशरहितु । रत काहीं. ॥२॥
मोक्षपाणी भवरिपु तो । कल्याण जपतों निसिदिनीं । रत कांहीं. ॥३॥
२. ( राग - काफी; ताल - दीपचंदी )
रामनामाचें भंडार लुटा । काळ गिळोन टाका गटगटा ॥ध्रु.॥
कीर्तनरंग भरला मोठा । येकमेकासी स्वानंदें भेटा ॥१॥
लाज सांडोनि मारी हांक मोठा । नामबळें फांडुं काळपोटा ॥२॥
साधुसंतांसि आवळोनि भेटा । मग कल्याण नंदा वैकुंठा ॥३॥
३. ( चाल - साधुसंता मागणें )
जाले कीर्तन शेवट गोड करा । मनीं धरा श्रीजानकीच्या वरा ॥१॥
कीर्तनरंगीं वाजवा करटाळी । नामघोषें पातकां होय होळी ॥२॥
येथूनी कल्याण साम्राज्य सुखरासी । आवघे उठा ओवाळा राघोबासी ॥३॥
N/A
References : N/A
Last Updated : December 09, 2016
TOP