अध्याय ३ रा - श्लोक ५४
श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा
यशोदा नन्दपत्नी च जातं परमबुध्यत । न तल्लिङ्गं परिश्रान्ता निद्रयापगतस्मृतिः ॥५४॥
द्वैपायनि म्हणे राया । प्रसूति होतां नंदजाया । तिची श्रांत झाली काया । योगमायाप्रभावें ॥३३॥
बोलती नगरींच्या गौळणी । वयातीत हे गुर्विणी । प्रसूतिकाळीं प्राणदानी । हो निर्वाणीं जगदंबा ॥३४॥
ऐशी सचिंत सर्व नगरी । प्रसूति झाली मध्यरात्रीं । गोळा पडतांचि बाहेरी । भरली शरीरीं योगनिद्रा ॥७३५॥
नाहींच खंडिलें जों नाळ । न पाहतां पुरतें बाळ । न करितां लिंगसांभाळ । केली विव्हळ निद्रेनें ॥३६॥
उदराबाहेर पडला गोळा । इतुकेंची जाणे यशोदा बाळा । लिंगनिर्देश याचेवेगळा । नाहींच कळला ते काळीं ॥३७॥
विचार करावा जों पुढतीं । तों योगनिद्रेनें हरिल्या स्मृति । सहित प्रसूति उपसूति । आली सुषुप्ति सर्वांसी ॥३८॥
एवं यशोदेपुढें घातला कृष्ण । देवकीपुढें कन्यारत्न । वसुदेवाचें पदबंधन । इतुकें कथन तुज केलें ॥३९॥
संकर्षण दोघीं पोटीं । कैसा म्हणूनि पुशिली गोठी । तरी कंसें केली आटाआटी । तें यादवसंकटीं हें केलें ॥७४०॥
आला दीनांचा कळवळा । देव झाला उताविळा । योगमायेची अघटित कळा । हे कथिली लीला द्वितीयाध्यायीं ॥४१॥
एवं कथिला प्रथम प्रश्न । द्वितीय प्रश्नाचें हें वचन । हरीसि कंसाचें भय कोण । कां व्रजभुवन सेविलें ॥४२॥
तरी देवकीनें चक्रपाणि । स्तवितां केली हे विणवणी । तुझें जन्म मजपासूनि । कंसालागूनि न कळावें ॥४३॥
तें मातेचें मनोगत । पुरवावया रमाकांत । गोकुळा गेला हा वृत्तांत । इत्थंभूत तुज कथिला ॥४४॥
अष्टम हा तुझा प्रश्न । त्यांत दोहींचें प्रतिवचन । षट्प्रश्नांचें निरूपण । क्रमेंचि श्रवण करीं पुढें ॥७४५॥
आणि उपप्रश्न जेर जे असती । पुढें पुढें जे करिजेती । त्या त्या प्रश्नांची निवृत्ति । ग्रंथसमाप्तीपर्यंत ॥४६॥
ऐसें श्रीमद्भागवत । जें निगमगर्भींचें परमामृत । महापुराण विख्यात । संहितासंकेत पारमहंस्य ॥४७॥
संख्या अठरा सहस्र विशद । त्यामाजीं हा दशमस्कंध । शुकपरीक्षित्संवाद । तृतीयाध्याय हरिजन्म ॥४८॥
एकाजनार्दनप्रसादगंगा । चिदानंदें स्वानंदओघा । लोटतां गोविंदकृपागंगा । दयार्णवचि सांठवण ॥४९॥
त्या कृपापीयूषग्रंथकथनें । श्रोते सुस्नात होती श्रवणें । आत्मसायुज्यप्राप्तिपुण्यें । कृतार्थ होणें सप्रेमें ॥७५०॥
दृष्टादृष्टार्थफलप्राप्ति । अभीष्टवरद रुक्मिणीपति । माझी सेवेसी हेचि विनती । कीजे संतीं सनाथ ॥५१॥
पुढिले अध्यायीं निरूपण । ऐकोनि योगमायेचें वचन । कंस भेणें करी कथन । दुष्ट प्रधान मिळवूनि ॥५२॥
जो जो विचार कथिला मंत्रीं । तो ऐकावया पवित्र श्रोत्रीं । अवधान देइजे सत्पात्रीं । हे सर्वत्रीं प्रार्थना ॥५३॥
गोविंद सद्गुरूचा किंकर । श्रीकृष्णदयार्णवानुचर । घाली श्रोतयां नमस्कार । श्रवणीं सादर व्हावया ॥५४॥
इति श्रीमद्भागवते महापुराणे अष्टादशसाहस्र्यां परमहंस्यां संहितायां दशमस्कंधे श्रीशुकपरीक्षित्संवादे हरिवरदाटीकायां दयार्णवानुचरविरचितायां श्रीकृष्णजन्मगोकुलाभिगमनं नाम तृतीयोऽध्यायः ॥३॥
श्रीकृष्णार्पणमस्तु ॥ श्लोक ॥५४॥ टीका ॥७५४॥ एवं संख्या ॥८०८॥ ( तीन अध्याय मिळून ओवीसंख्या २७१५ )
तिसरा अध्याय समाप्त.
N/A
References : N/A
Last Updated : April 26, 2017
TOP