मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|हरिवरदा|अध्याय ८८ वा| विशेष श्लोक १ ते २ अध्याय ८८ वा आरंभ श्लोक १ ते ५ विशेष श्लोक १ ते २ श्लोक ६ ते १० श्लोक ११ ते १५ श्लोक १६ ते २० श्लोक २१ ते २५ श्लोक २६ ते ३० श्लोक ३१ ते ३५ श्लोक ३६ ते ४० अध्याय ८८ वा - विशेष श्लोक १ ते २ श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा Tags : harivaradakrishnapuranकृष्णपुराणहरिवरदा विशेष श्लोक १ ते २ Translation - भाषांतर श्लोकसम्मतिः - सत्वस्य शान्त्या नो जातु विष्णोर्विक्षेप मूढते । रजस्तमोगुणाभ्यां तु भवेतां ब्रह्मरुद्रयोः ॥१॥गुणाः सत्त्वादयः शान्त घोरमूढाः स्वभावतः । ब्रह्मविष्णुशिवांनां च गुणयन्तृ स्वरूपिणाम् ॥२॥एवं सत्व रज आणि तमीं । ज्ञानक्रिया द्रव्यनामीं । शक्ति नैसर्गिक प्रथमोद्गमीं । शान्त्यादिनियमीं विलसती ॥१३॥जेंवि पूर्णिमा तेथ संपूर्ण चंद्र । चंद्र तेथें ज्योत्स्नाप्रसर । ज्योत्स्ना तेथ निरंतर । असे प्रचुर शीतळता ॥१४॥कीं संत तेथें असे विवेक । विवेकीं समाधान सम्यक । समाधानीं वसे सुख । सुखीं अचुक विश्रान्ति ॥२१५॥कीं आलस्य तेथें जडता । जडता तेथ निद्रा तत्वता । निद्रा तेथ अचेष्टता । होय सर्वथा जया परी ॥१६॥कीं आशा तेथ प्रबळ दुःख । दुःख तेथें वाटे शोक । शोकीं संबोह अचूक । असे निष्टंक ठेविलासा ॥१७॥तेंवि सत्व तेथेंचि केवळ ज्ञान । ज्ञान तेथेंचि शान्ति संपूर्ण । शान्ति जेथें तो पुरुष निर्वुण । विकारहीन ओळखिजे ॥१८॥तम तेथें चि अज्ञान । अज्ञानीं मूढत्व सघन । मूढत्वीं सबळ अभिमान । अभिमानीं सगुण तो पुरुष ॥१९॥रज तेथेंचि क्रियाशक्ति । क्रिया तेथ विक्षेप निश्चिती । ऐसी हे त्रिगुणाची स्थिति । विविधा रीती स्वाबाविक ॥२२०॥यास्तव संपूर्ण सत्व विष्णु । पूर्णबोधें सुशान्ततनु । विक्षेपमूढता त्या लागून । सकारण न होती ॥२१॥आणि रजस्तमात्मक ब्रह्महर । त्या विक्षेपमूढता निरंतर । हा गुणवैशिष्ट्यप्रकार । कथिला साचार यथास्थित ॥२२॥जेंवि सरिताप्रवाहीं पोहणार । तया अभीष्ट जाणें परपार । परंतु प्रवाहबळें वाहणें फार । अनुपायें प्रवाहवशवर्ती ॥२३॥तेंवि सत्वांशें ज्ञानसंपन्न । परि प्राधान्यें जे विशिष्ट गुण । तच्छक्तिबळें तदधीन । होय वर्तन आवश्यक ॥२४॥गुणयोगें गुणाभिनिवेश । धरितां होय तत्प्रकाश । तद्नुकरणें आपणांस । जे विशेष आविष्करिती ॥२२५॥एर्हवीं मायोपाधिक सर्वेश्वर । तदंश हिरण्यगर्भीं देवताचक्र । त्या स्वयंभू स्वरूपसाक्षात्कार । मुळींच अविसर तन्मयता ॥२६॥त्यासी गुरुसंप्रदायक्रम । ज्ञानोपलब्धीसी नाहीं परम । स्वयेंचि संप्राप्त निजात्मधाम । स्वसुख सुगम सर्वदा ॥२७॥याज्ञवल्क्यासी बृहदारण्य । सूर्योपदिष्ट हें प्रमाण । कीं भृगूसी प्रबोधी वरुण । उपनिषत् पूर्ण भृगुवल्ली ॥२८॥एवं सुर समष्टिकरणरूपी । अनुभवीं सर्वदा निर्विकल्पी । परि पदाभिमानें प्रवृत्ति वोपी । माजी साक्षेपी यादवसत् ॥२९॥नियुक्तपदाचा अभिमान । धरूनि वर्तती साधारण । भोग भोगिती स्वसिद्धिजन्य । केवळ निमग्न होवोनी ॥२३०॥जेंवि ज्यास जो अभिनिवेश । तेचि प्रतिपादी विशेष । तेंवि इन्द्रादि जे इंद्रियाधीश । देती भजकांस स्वसंपदा ॥३१॥एवं षोडशविकार जे कथिले । पृथक चंद्रादिनामाथिले । त्यांसी जे भजती भाववळें । तत्संपदा वहिले पावती ॥३२॥जैसी जयाची उपाधि । तदनुरूप भजक सिद्धि । पावती ते विज्ञानोपलब्धि । न पवती कधीं साधारण ॥३३॥मा सर्व संपत्तीचें अधिष्ठान । द्रव्यशक्तिकृत तमोगुण । तमोगुणी पूर्ण गौरीरमण । संपत्तिप्रदान करी भजकां ॥३४॥एथ संदेह नसेचि कांहीं । प्रकट उमजे सर्वांसही । म्हणोनि विशेषें भोग नवाई । सत्वर पावती शिवभक्त ॥२३५॥आणि क्कचिन्मोक्षार्थी जे भजती । ते चिरकाळें मोक्ष पावती । कीं सत्वांशें ज्ञानशक्ती । असे निश्चिती सामान्य ॥३६॥केवळ शान्तीचें अधिष्ठान । ज्ञानशक्ती स्तव सत्वगुण । तो पूर्णसत्व रमारमण । करी मोक्षदान निजभक्तां ॥३७॥तैसी च क्कचिद्भोगसंपत्ति । स्वभक्तांसि दे लक्ष्मीपति । कीं अंशत्वें तमाप्रति । असे निश्चिती अधिष्ठान ॥३८॥प्रमादकारक भोगवैभव । स्वभक्तां नेदी यास्तव । ज्ञानवैराग्यगौरव । देऊनि वास्तव प्रबोधी ॥३९॥तथापि सर्वकामनाबीज । स्वभक्तांचें पाहूनि सहज । उत्कृष्ट संपत्ति त्यां दे अज । परी विवेकवोजपूर्वक ॥२४०॥विवेकवैराग्ययोगें । वास्तवज्ञानानुरागें । मोहित न होती भोगें । संतसंगें सुखावती ॥४१॥ध्रुव प्रह्लाद अंबरीष । इत्यादि उत्कृष्ट संपत्तीस । भोगितां न झाले सदोष । उत्पथावेश न धरूनी ॥४२॥यज्ञदानादि स्वधर्माचरणें । निष्कामभावें नवविध भजनें । सज्जनब्राह्मणगुरुतोषणें । हरी कारणें ते भजले ॥४३॥विवेक विरागी भजनानुरागी । सहसा न रमती विषयसंगीं । स्वधर्म आचरती आस्था चांगीं । उदास भोगीं हरिभक्त ॥४४॥हें असो जरी म्हणाल । तमोगुणी जासनील । तरी कां असे अभेदशीळ । हरि प्राञ्जळ भोगयुक्त ॥२४५॥तरी हा ऐसा अभिप्राय । जेथ अवान्तर गुण प्राप्त होय । तो मूळ गुणाहूनि विलसे बाह्य । परि साधन होय मूळगुण ॥४६॥यास्तव प्राधान्यें शंकर । तमोगुणी हा निर्धार । तेथ सत्वांश अवान्तर । कर्पूरगौर म्हणऊनी ॥४७॥बाह्य तनुभा धवळ चांग । भोगत्यागादि हें सत्वलिंग । बीभत्साचरणाद्यनेग । जडता मोह तोष रोष ॥४८॥हे अंतरंगतमोविकार । बाह्य प्रकटती विशेषाकार । सत्योपमर्दें तमप्रचुर । शिवीं निरंतर उमटती ॥४९॥ क्षुब्ध अथवा सुप्रसन्न । अविलंबें अल्प गुणावगुण । पाहूनि होय न विचारून । हितकारण भक्तांचें ॥२५०॥आणि सत्वगुणात्मक श्रीहरी । तेथ अंशत्वें तम निर्धारीं । तल्लिङ्ग मिरवी बाह्याकारीं । श्याम साजिरी निजकान्ति ॥५१॥महत्सिद्धि उत्कृष्ट भोग । सर्व संपत्तीचा योग । बाह्यसंभ्रम हा तमःप्रसंग । द्रव्यशक्तिक जाणिजे ॥५२॥शान्ति क्षमा आणि ज्ञान । करुणापाङ्गविवेकाचरण । हें अंतःस्थ सत्वलक्षण । तमोपमर्द्दनपूर्वक ॥५३॥म्हणोनि अंतरंग पूर्णबोधें । आसक्त नोहे समृद्धिवेधें । साक्षीभूत परमानंदें । प्रकृतिरोधें गुणातीत ॥५४॥गुणातीत म्हणोनि निर्गुण । त्या निर्गुणत्वाचें लक्षण । पूर्वीं कथिलें विस्तारून । तो ब्रह्म पूर्ण श्रीहरी ॥२५५॥ऐसिया निर्गुणा हरीतें । जे जे भजती प्रेम आतें । त्यांसी नेदी वैभवातें । जाणोनि हितातें तयांच्या ॥५६॥ज्ञान वैराग्य निष्कामप्रेम । देवोनि गौरवी भक्तोत्तम । जेणें पावती मोक्षधाम । पुनरागमनविवर्जित ॥५७॥ऐसे हे हरिहर समर्थ । भक्तानुग्रही श्यामशेत । अन्योन्यगुणांतें मिरवीत । जिवलग अत्यंत अभेदें ॥५८॥हरि अंतरीं पूर्णसत्व । बाह्य मिरवी तमःप्रभाव । हर अंतरीं तमःस्वभाव । बाह्यभाव सत्वगुणी ॥५९॥म्हणूनि हरीचें हृदय हर । आणि हराचें हृदय श्रीधर । परस्परें तत्तदाकार । अभेद मित्र अनादि ॥२६०॥हे उभयतांची अभेद विविक्षा । उमजे सर्वज्ञां विचारदक्षां । अल्पज्ञ धरूनि तत्पक्षा । सामान्यविशेषा मानिती ॥६१॥ते मूर्ख अत्यंत मतिमंद । न जाणती तत्व अभेद । मुळीं एकचि वस्तु त्रिविध । हरिहरभिधविरिंची ॥६२॥तेथ शान्ति मूढता विशेष । हे गुण स्वभावारोप । हरिहरभक्तांचा वाद अमूप । कलहरूप तो व्यर्थ ॥६३॥सत्वें ज्ञानाचा उत्कर्ष । तेणें प्रकृतीसह निरास । अच्युतीं गुणाचा निःशेष । म्हणोनि रमेश निर्गुण ॥६४॥तम अज्ञाना अधिष्ठान । तें प्रकृतीसह पोशी गुण । यास्तव शक्तियुक्त सगुण । गौरीरमन निरंतर ॥२६५॥शंकर सगुणत्वास्तव । भजकां विशेषें दे वैभव । हरि निर्गुणत्वें यास्तव । निजानुभव दे भक्तां ॥६६॥एवं सगुणभजकां गौणप्राप्ती । निर्गुणभजक निर्गुण होती । ऐसी येथील व्याख्यानरीति । यथानिगुती निरूपिली ॥६७॥मूळश्लोकाचा अभिप्राय । केवळ बीजवृक्षप्राय । विस्तारिला यथान्वय । शुकोक्त सोय विवरूनी ॥६८॥ना तरी दुधा माजी धारवणी । घालूनि विरस फारपणीं । करिजे तैसें न वदली वाणी । मुळींची सोडूनि व्यासोक्ति ॥६९॥सुज्ञां संज्ञामात्रें कळे । तेथ गुंतोनि पडती अबळें । तेंचि साद्यंत कथितां बोलें । उमजे वहिलें कीं ना हो ॥२७०॥संज्ञेनें कथिली अक्षमाळा । अभिज्ञा तदर्थ उमजला । पृथम्बर्णोंच्चारें अबळां । उमजे तद्वद्विस्तार हा ॥७१॥हेंचि विस्तारिलें प्रमेय । पुढें उदाहरण इतिहासमय । शुकें कथिलें तेथें विदित होय । निःसंदेह अध्यायांत ॥७२॥तैं द्वैपायनिभाषण । परीक्षिति करी श्रवण । श्रोतीं होऊनि सावधान । एकाग्रमनें परिसावें ॥७३॥शुक म्हणे राया भारता । पूर्वीं हाचि प्रश्न रुक्मिणीकान्ता । युधिष्ठिरें केला तत्वता । जो त्वां आतां मज केला ॥७४॥ N/A References : N/A Last Updated : June 13, 2017 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP