ब्रह्मोवाच ॥
भगवन् सर्वभूतानामध्यक्षोऽवस्थितो गुहाम् ॥ वेदह्यप्रतिरुद्धेन प्रज्ञानेन चिकीर्षितम् ॥२५॥
॥ टीका ॥
तूं सर्वभूतां अधिष्ठान ॥ भूतहृदयस्थ सज्ञान ॥ तुझेनि बुद्धीसी जाणपणा ॥ तुझेनि चेतन इंद्रियवर्ग ॥२१॥
तूं कर्माध्यक्ष तत्त्वतां ॥ तेथें तूंचि कर्ता करविता ॥ तरी ऐकें माझी अवस्था ॥ तुज मी अच्युता सांगेन ॥२२॥