मायां विविदिषन्विष्णोर्मायेशस्यमहामुनिः ॥ महाभागवतो राजन्पितरं तर्यतोषयत् ॥४२॥
॥ टीका ॥
मायानियंते ह्मणती राया ॥ त्या शिवादिकां मोहिलें माया ॥ ते निजमाया निरसावया ॥ नारद उपाया पुसों इच्छित ॥८९॥
माया निरसावया आपण ॥ मायानियंता श्रीनारायण ॥ त्यासी जाणावया संपूर्ण ॥ अनन्यशरण निजजनकासी ॥७९०॥
पितामातागुरुत्वेंसी ॥ ब्रह्मा पूज्य नारदासी ॥ सद्भावें सेवितां अहर्निशीं ॥ अति उल्हासेंसी तुष्टोनियां ॥९१॥
नारद महाभागवत ॥ भगवंतीं नित्य निरत ॥ त्यासी ब्रह्मा प्रसन्न होत ॥ निजबोधयुक्त स्वानंदें ॥९२॥