मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|टीका| श्लोक ३९ टीका आरंभ श्लोक १ ते ४ श्लोक ५ श्लोक ६ श्लोक ७ श्लोक ८ श्लोक ९ श्लोक १० श्लोक ११ व १२ श्लोक १३ श्लोक १४ श्लोक १५ श्लोक १६ श्लोक १७ श्लोक १८ श्लोक १९ श्लोक २० श्लोक २१ श्लोक २२ श्लोक २३ श्लोक २४ श्लोक २५ श्लोक २६ श्लोक २७ श्लोक २८ श्लोक २९ श्लोक ३० श्लोक ३१ श्लोक ३२ श्लोक ३३ श्लोक ३४ श्लोक ३५ श्लोक ३६ श्लोक ३७ श्लोक ३८ श्लोक ३९ श्लोक ४० श्लोक ४१ श्लोक ४२ श्लोक ४३ श्लोक ४४ श्लोक ४५ आरती एकनाथाची अथ चिरंजीवपदप्रारंभः नानक चतुःश्लोकी भागवत - श्लोक ३९ एकनाथमहाराज कृत - चतुःश्लोकी भागवत Tags : bhagvatekanathsantएकनाथभागवतसंत श्लोक ३९ Translation - भाषांतर अंतर्हितेंद्रियार्थाय हरये विहितांजलिः ॥ सर्वभूतमयो विश्वं ससर्जेदं स पूर्ववत् ॥३९॥ ॥ टीका ॥श्रीनारायण साकारला ॥ तंव तो इंद्रियां विषय केला ॥ तोचि इंद्रियातीत जाहला ॥ या नांव पावला अंतर्धाना ॥६३॥वस्तु असुनी परिपूर्ण ॥ इंद्रिया विषय नव्हे जाण ॥ यानांव सत्य अंतर्धान ॥ सत्य सत्य सज्ञान बोलती ऋषी ॥६४॥इंद्रियातें नव्हे दृष्ट ॥ त्यातें ह्मणती गा अदृष्ट ॥ या अर्थीं ते पुराणश्रेष्ठ ॥ बोलती पाठ अंतर्धान पैं ॥७६५॥एवं हरि पावला अंतर्धान ॥ त्यासी स्वयें चतुरानन ॥ बद्धांजळीं करी नमन ॥ स्वानंदपूर्ण समसाम्य ॥६६॥पूर्वीं सृष्टि नकरवे ह्मणे ॥ ते सगळी सृष्टि स्वयें होणें ॥ बाप सद्गुरूचें करणें ॥ अगमा दावणें सुगम करुनि ॥६७॥नमाखतां हातपावो ॥ सृष्टिसर्जनीं ब्रह्मदेवो ॥ सद्गुरूचे कृपेचा नवलावो ॥ अलिप्तपणें पहाहो ब्रह्मांड रचवी ॥६८॥एवं निर्विकल्प कल्पना ॥ ब्रह्मा करी सृष्टिसर्जना ॥ भूतभौतिकादिगुरुरचना ॥ पूर्णस्थिती जाणा जैशीतैशी ॥६९॥रचिले चतुर्विध भूतग्राम ॥ चारी वर्ण चारीआश्रम ॥ सुरनरादि अधमोत्तम ॥ अखिलस्वधर्मकर्म विधानोक्त ॥७७०॥स्रष्टा करी सृष्टिसर्जन ॥ तें आपणाहुनि नदेखे भिन्न ॥ आपणामाजीं सृष्टि संपूर्ण ॥ आपण परिपूर्ण सृष्टीमाजीं ॥७१॥ब्रह्मा स्वयें सृजी निष्काम ॥ तरी लोकहितार्थ यमनियम ॥ आचरोनी स्वधर्मकर्म ॥ दावी सुगम प्रजांसी विधी ॥७२॥ References : N/A Last Updated : August 03, 2017 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP