सासरवासिनी बोलवा पाचजणी
नवरा मुलगा देवगुणी

मांडवाच्या दारी हळदीचा पाट गेला
गोर्‍या मैनाचा बाप न्हाला

मांडवाच्या दारी हळदीचं वाळवण
गो‍र्‍या मैनाला केळंवण

घाणा भरीयेला म्या सव्वाखंडी गहू
गोर्‍या मैनाला गोत बहू

घाणा भरीयेला म्या सव्वाखंडि म्या भाताचा
नवरा मुलगा गोताचा बाळराज

सासरवासिनी अशा कंथाच्या पाहिल्या
तेल लावू आल्या नवरीला

आधी मूठचिठ्ठी धाडावी ध्वाडीला
आई अंबाबाई वाघ जुपीले गाडीला

आधी मूळचिठ्ठी घुंगराची गाडी
देवगुणी राज शालजोडी ती वराडी

मांडवाच्या दारी उभ्यानं विडा घेती
आई अंबाबाई चहूकडं लक्ष देती

मांडवाच्य मेढी दूर दूर सारा
देवगुणी राज लोडाशी जागा करा

सारविल्या भिंतीवर काढीली परात
गोरी मैना माझी तुझ्या लग्राची वरात

सारविल्या भिंतीवर काढीले ताम्हान
गोरी मैना माझी तुझ्या लग्राचं सामान

N/A

References : N/A
Last Updated : February 28, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP