संग्राहिका - सौ . कुमुदिनी पवार
लग्नात मुली, स्त्रीया, आजीबाई मोठ्या उत्साहाने गाणी म्हणत.
नवरदान घेता होतों अंगाचा थरकाप
हावशा बाळा माज्या आहे पाठीशी उभा बाप
हळद गजबजी पिवळं झाल्याती माजं पायी
नवरदेवा बाळा लेका तुजी मी वरमाई
मारुतीरायाच्या देवळी लहान नवरा सांगीयीती
बाळाला माज्या मामा पिवळामंदील बांधीयीती
हळद गजबजी हळदीबाईचा पिवळा ठसा
सयांना किती सांगू बाळ माझा ग देवमासा
हळद गजबजी पिवळं झाल्याती माझं बाहू
सयांना किती सांगू नवरदेव ग माझा भाऊ
आयांनू बायांनू ग तुम्हा सांगते वाणायाला
हळद लागय़ीली माज्या चंदरबाणायीला
मोठयाचा नवयीरा कसा निघाला घाई घाई
करवली ग चतूईर त्येच्या गालाला काळं लाई
आयांनू बायांनू ग तुम्हां पदर पालवीते
बाळाच्या माझ्या तुम्हा हळदीची ग जाती
आयांनू बायांनू ग तुम्हा येती मी काकुलती
बाळाची माझ्या बाई येळ हळदीची ग जाती
आयांनू बायांनू ग आपून मानाच्या पहीयील्या
बाळाचा घाणा चला भराया बोहीयील्या
नवरदेवा परायास करवली ग उताय़ीळ
दिव्याच्या उजेंयीडी बाई वविती मुंडायीळ
वाजत गाजयीत आली दुरडी केळायाची
वरमाई ग झाली गोरी आपुल्या बाळाची
नवर्या परायास करोलीबाईचा दिमाईख
बाई ग माझी चाले हिल्लाळ समुयीख
कन्यादानाची करा घाई मामा आणि मावळण
मानाची मावळण आहे भाग्याची गवळण
हळद गजबजी बाई पिवळा माझा गोट
नवरदेवायाला कोण भरीते मळवट
वर्हाड उतरीलें आंबा सोडुन चिंचेखाली
गावात वर्दी गेली मैन भावाची यीन झाली
मांडवाच्या दारी बाजा वाजतो र्हाऊ र्हाऊ
पायामधी तोडा उभा नवर्याचा भाऊ
मांडवाच्या दारी बाजा वाजत र्हाऊंद्या
बाळायाचा घोडा मला खेळता पाहूंद्या
मांडव बाई घाला जागा पईस रुंद धरा
लई गोताचा नवय़ीरा
मांडव बाई घाला जोतं सोडून सव्वा हात
नवर्या बाळाचं लई गोत
मांडव बाई घाला निच्चळ झेंडवाचा
छंद नवर्याच्या बंदवाचा
इवाई करु गेल दीर दाजीबा बोलेनात
मला इवाई पेलेनात
इवाई करु गेले यीनी नाईत्या माज्या तोला
बंधूसाठी म्या बोल दिला
वीस पुतळ्यावरी सरी दाब झळकीतो साडीवरी
नवरी मामाच्या कडीवरी
N/A
References : N/A
Last Updated : February 28, 2018
TOP