समाधि प्रकरण - उपसंहार
निरंजन माधवांच्या कवितेतील काव्यस्फूर्ति उच्च दर्जाची असून, भाषेत रसाळपणा व प्रसाद सोज्वळता आहे.
श्रीनामदेवकृत मुख्य प्रबंध होता
तैसाचि म्यां विरचिला सुखबोधदाता ।
मी बोलिलों पदरिची तरि एक वाणी
नाहींच, साक्ष हरि विठ्ठल चक्रपाणी ॥१९॥
या कारणें सकळसंतजनीं महंती
हें आदरें परिसिजे करुणावसंतीं ।
मी दीन जाणुनि शुकोक्तिसमान कीजे
जे दुष्टबुद्धि मतिहीन तयां न दीजे ॥२०॥
श्री ज्ञानेश्वर तो निवृत्ति सुखदा सोपानमुक्तापदीं
मी साष्टांग नमीतसें पुनरपि तोषें सदा पूर्णधी ।
देवा मी तुमच्या प्रसादाविभवें हा ग्रंथसिंधू बरा
झालों पार कृपा तरी वळघलों मी धन्य लोकीं खरा ॥२१॥
आतां हा अतिमान्य सर्व जगतीं होयील ऐसें करा
सेवा घेउनियां प्रसिद्ध घडवा लोकांत या किंकरा ।
माझी हे विनंती असी विलसते सद्भाविकां तारणी
झाली हो तुमची सुकीर्ति सुगमा सद्बोधमंदाकिनी ॥२१॥
श्रीमद्विठ्ठलपादपंकजयुगा हे गद्यपद्यात्मिका
माला दिव्य समर्पिली कमलजा सद्भक्त हो आयका ।
यीचा तो मकरंद पुष्टिद असे जा भाविकां षट्पदां
येथें काव्यकलाकलाप विलसे सौरभ्य व्या सर्वदां ॥२३॥
श्रीमन्माधवपंडितेंद्रतनये भागीरथीनंदनें
विश्वामित्रकुळाब्धिशीतकिरणें सत्सौख्यदें चंदनें
केला ग्रंथ निरंजनें कविवरें संतांचिया तोषणा
वाचा श्रेष्ठ कृपा करोनि सकळीं मानोनि मद्भाषणा ॥२४॥
नोहे मत्पुरुषार्थ काव्यरचनीं श्रीविठ्ठले अंतरीं
केला बैसुनि हा प्रबंध बरवा तैं चालिली वैखरी
श्रीज्ञानेश्वरभक्तराजमहिमा लोकत्रयाच्या हिता
योजी देनाजनोद्धरार्थ परिसा नोहे फुकाची कथा ॥२५॥
हे धर्मार्थसमस्तकास पुरवी वाचोनि निष्ठा धरी
ऐशा या सुजनांसि सत्य घडली वैकुंठिची पायरी
जावें ज्याप्रति वाटतें हरिपदा तेणें सुखें घेयिजे
हा मोहार्णव एकदांचि सुजनीं या जाहजें लंघिजे ॥२६॥
हे तों श्लोक असे जनांसि दिसती नोहोत चिंतामणी
हे तों केवळ कल्पपादपफळें हे सांडली मेदिनी
हे वाणी सुरभी निजामृतरसें सर्वांजनां तोषवी
यासाठीं सुजनी अवश्य करुनी प्रेमें धरावी जिवीं ॥२७॥
वाक्पुष्पें हरिपादपंकजयुगीं लक्षावळी वाहिली
वाग्रत्नें रसनाख्यदिव्यपरळीं दीपप्रभा दाविली
किंवा सोज्वळ फुल्ल पद्मकमळें म्यां अर्पिली श्रीधरा
केलें काव्यसुधारसें स्त्नपन त्या सर्वाद्यसर्वेश्वरा ॥२८॥
हें झाले गुरुसेवनीं फळ मला सच्छास्त्र जें पाहिलें
या कीं मूढमतीमुखें वदविलें आख्यान लोकत्रया
देतें पूर्ण मना चमत्कृति असी श्रीविठ्ठलाची दया ॥२९॥
श्रीलक्ष्मीधरबापदेवचरणीं मच्चित हें वेधलें
तेव्हां श्रीहरिभक्तिनामक मला सद्रत्न हें साधलें
आहे स्पर्शमणीच ग्रंथ समजा तात्काळ मोठ्या जडा
कर्ता कांचन हा विचित्र महिमा पाहा तुम्ही रोकडा ॥३०॥
स्वस्तिश्री नृपशालिवाहन शके सप्ताष्टषट्चंद्रमा
शोभे पार्थिवनामवत्सर बरा जो प्रेयसर्वोत्तमा
तन्मध्यें तरि उत्तरायण असे हे फाल्गुनी पंचमी
पक्षीं शुक्ल विशेष आणि कमलावारीं महाउत्तमीं ॥३१॥
झाला ग्रंथ विचित्र पुण्यनगरीं पुण्ये गुरुच्या असा
पुण्यानें घडला पुरातनकृता आला कळों भर्वसा ।
हा तों पुण्यवतांसि योग्य विलसे वाचावयाकारणें
निंदा पुण्य़जनींच यास करिजे उन्मत्त वाणी मनें ॥३२॥
श्रीज्ञानेश्वर श्रीनिवृत्ति तिसरा सोपान तो सद्गुरु
तीघेही मिळतां प्रयाग ह्मणिजे अत्यंत तीर्थेश्वरु ।
मुक्तायी मणीकर्णिका विलसते काशी अळंदीपुरी
इंद्राणी सकळाघसंघशमनी भागीरथी दूसरी ॥३३॥
या तीर्थाहुनि अन्यतीर्थ नलगे मानेचिया या मना
माझी हे परिपूर्ण आजि घडली येथेंचि ते कामना ।
क्षेत्रन्यास करोनि चित्त बसलें माझें अळंकापुरीं
आतां मोक्ष उदार देयिल मला ज्ञानेश्वर श्रीहरी ॥३४॥
हा सत्यव्रत हा परात्पर गुरु हा दीनबंधू असे
हा लोकोत्तर हा यशोनिधि पहा लोकत्रयीं उल्लसे ।
यासाठीं दृढ पादपद्म धरितां प्रेमें बनाजी कवी
केला मान्य जगांत या मिरविला हीनास्त जैसा रवी ॥३५॥
इतश्रीम्त्कविकुलतिलकयोगीनिरंजनविरचित श्रीज्ञानेश्वरविजय-
महाकाव्ये समाधिवर्णने मोक्षप्रदोनाम द्वादशोध्याय: ॥ संपूर्ण सद्-
गुरुचरितं श्रीसुंदरकृष्णार्पणमस्तु: ॥
॥ श्रीरस्तु । शुभं भवतु ॥
N/A
References : N/A
Last Updated : February 28, 2018
TOP