मार्गशीर्ष शुद्ध ३
दिन विशेष - वर्षातील प्रत्येक दिवसाचे ऐतिहासीक महत्व.
बाबराची भारतावर स्वारी !
शके १४४७ च्या मार्गशीर्ष शु. ३ या दिवशीं हिंदुस्थानांत मोंगली सत्ता स्थापन करणारा दिल्लीचा पहिला बादशहा जहीरुद्दीन महंमद बाबर हा हिंदुस्थानवर स्वारी करण्यास निघाला. बाबर हा बापाकडून तैमूरलंगाचा व आईकडून चेंगीजखानाचा मोंगल वंशज होता. तैमूरच्या काबूल राजधानींत यास राज्याभिषेक झाल्यावर यानें आपल्या राज्यविस्तारास प्रारंभ केला. सन १५९९ मध्यें यानें हिंदुस्थानवर पहिली स्वारी केली. त्या वेळीं दिल्लीस इब्राहीमखान लोदी राज्य करीत होता. त्यास बाबरानें निरोप पाठविला : " पंजाब प्रांत तैमूरच्या वंशजाकडे चालत आला आहे, तो आपण परत द्यावा, नाहीं तर लढाईस सिद्ध व्हावें" पुढें पांच-चार वर्षांतच मदत मागितली. बाबर संधीची वाटच पहात होता. ताबडतोब हिंदुस्थानांत येऊन त्यानें पंजाब प्रांत आपल्या ताब्यांत घेतला. या वेळीं त्याच्या विशेष ध्यानांत आलें कीं, हिंदुस्थानांत फारच अव्यवस्था माजून राहिली आहे. राज्यलोभाची हाव सुटून त्यानें हिंदुस्थान जिंकण्याचा बेत केला. इब्राहीमखान लोदी कमकुवत होता. त्यांच्यात लढण्याचें सामर्थ्य नव्हतें. बाबराच्या मनांतील हा भाव पाहून दौलतखान लोदी त्याला सोडून गेला. तरी इब्राहीमचा भाऊ अल्लाउद्दीन लोदी बाबराकडे मदतीसाठीं गेलाच होता. या संधीचा फायदा घेऊन त्यानें आपलें सैन्य त्याच्या मदतीस हिंदुस्थानांत पाठविलें. पण त्याचा पराभव झाला. अल्लाउद्दीन पंजाबांत पळून गेला. हें बाबरास समजतांच त्यानें विशेष तयारी केली व हिंदुस्थानवर स्वारी करण्यासाठीं मार्गशीर्ष शु. ३ रोजीं तो निघाला. बाबर येत आहे असें समजतांच दौलतखान व त्याच्या मुलगा गाजीखान हे दोघेहि पळून गेले. त्यानंतर बाबरानें दिल्लीवर चाल केलीं. इब्राहीमची व त्याची गांठ पानिपतच्या रणांगणावर पडून मोठें युद्ध झालें. त्यांत लोदीचा संपूर्ण पराभव होऊन तो स्वत:च कामास आला आणि बाबरानें मोंगली, सत्तेचा पाया हिंदुस्थानांत स्थिर केला.
- १७ नोव्हेंबर १५२५
N/A
References : N/A
Last Updated : October 02, 2018
TOP