संशयरत्नमाला - श्लोक १ ते ४
मोरोपन्त (मोरेश्वर रामजी पराडकर, १७२९–१७९४) यांच्या संशयरत्नमाला काव्याचा मुकुन्द गणेश मिरजकर यांनी संस्कृतानुवाद केला.
उठतां बहु त्वरेनें
कोठे जाता असे तुम्हां देवी ।
पुसतां झाली जाणे ।
पुसतां ज्ञाता पुढे न पद ठेवी ॥१॥
किंवा नारद आला
आलापीत त्वदीय सच्चरितें ।
प्रेमळ गीत तुम्हाला
हरि हरिणापरिस बहूत वश करिते ॥२॥
की माझे दुर्दैव
प्रभुच्या मार्गात आडवे पडले ।
शरणागतभयशमना
यास्तव येणे तुझे नसे घडले ॥३॥
किंवा मजहूनि दुसरा
कोणी बहू दीन दास आढळला ।
तच्छुभदैवसमीरएं
त्यावरि करुणाघन प्रभू वळला ॥४॥
संस्कृतानुवाद
त्वरयोत्थितमन्वयुड्क्त वा
क्व नु यासिती भगन्तमिन्दिरा ।
गमने न मति करोत्यहो
अनुयुक्तश्र्चतुरो मनागपि ॥१॥
तव नैकगुणान् प्रकीर्तयन्
समगाद् ब्रह्मसुतोऽथवा प्रभो ।
कुरते हरिणाधिकं वशं
भगवंस्त्वां सरसार्थगीतिका ॥२॥
हतदैवमिदं ममाथवा
द्रुतमागत्य पपात ते पथि ।
शरणागतवत्सल त्वयाऽऽ
गमनं नैव ततो व्यधायि वा ॥३॥
अथवा मदपेक्षाऽपरो
भजको दीनतरो नु लक्षित: ।
गतवांस्तं करुणाघनो भवान् ॥४॥
N/A
References : N/A
Last Updated : January 24, 2019
TOP