संशयरत्नमाला - श्लोक २१ ते २४
मोरोपन्त (मोरेश्वर रामजी पराडकर, १७२९–१७९४) यांच्या संशयरत्नमाला काव्याचा मुकुन्द गणेश मिरजकर यांनी संस्कृतानुवाद केला.
की हाक ऐकतांचि
प्रभुला हा रक्षणार्हसे वाटे ।
वाटे या दु:शील-
ग्रीष्मीं तव नवदयानदी आटे ॥२१॥
की पावावे समयी
सदय मनातूनि योजिले जरि ते ।
तरि जेवि रुक्मिणीचे
चित्ता माझे अधीर मन करिते ॥२२॥
किंवा पुराणपुरुषा
संप्रति बहु भागलासि या कामी ।
तुज नीज लागली तो
सजलो मारावयासि हाका मी ॥२३॥
किंवा बरी परिक्षा
केल्यावांचून न प्रसाद करा ।
तरि वरि तसाच आंतहि
उगाळितां कोळसा प्रयास करा ॥२४॥
जन एष नु रक्षणोचित:
प्रथमं शोकरवात्तवाभवत् ।
पथि दु्ष्टतपर्तुना मया
तव शुष्काऽथ नवा दयासरित् ॥२१॥
सदये ह्रदि वा विनिश्चितं
समये मामकरक्षणं त्वया ।
तदपीह मनो ममोत्सुकं
दुहितुर्भीष्मकभूपतेर्यथा ॥२२॥
र्ग्लपितस्त्वं नु पुराणपुरुष ।
अथ च त्वयि निद्रिते क्षणं
परुषाक्रन्दनतत्परोऽभवम् ॥२३॥
दयसे न विना परिक्षणा -
दिति चेद् हन्त वृथा श्रमस्तव ।
क इवात्र करं प्रयाससे-
च्छिशिरान्डारविघर्षणे नर: ॥२४॥
N/A
References : N/A
Last Updated : January 24, 2019
TOP