संशयरत्नमाला - श्लोक ३७ ते ४०

मोरोपन्त (मोरेश्वर रामजी पराडकर, १७२९–१७९४) यांच्या संशयरत्नमाला काव्याचा मुकुन्द गणेश मिरजकर यांनी संस्कृतानुवाद केला.


की हो कलानिधी व्दिज -
राज नको ज्यासि लागला डाग ।
तरि काय प्रभुवर्या
चुकला तुमचा गुरु महाभाग ॥३७॥
की वाटले खळाला
मुक्ति न द्यावी जशी सुधा सर्पा ।
तरि ती अघादिकांला
द्या सुवरा भक्ति मात्र मज अर्पा ॥३८॥
की अकृपा नावडती
आवडती स्त्री कृपा तिचे प्राज्य ।
लोकत्रयात देवा
पहिलींचे काय एक मी राज्य ॥३९॥
की गमले जरि आधी
म्हणतो दावा स्वपाद या लोकी ।
जो जो वांछिल जे जे
ते ते द्यावे मुधादयालो कीं ॥४०॥


अथ माऽस्तु कलाधिपोऽपि सन्
व्दिजराज: सकलड्क एष मे ।
इति चेद् वरद: शिवो गुरु-
स्तव किं वाऽस्त्यविवेकभाजनम् ॥३७॥
उचितं किमु मन्यसेऽय़वा
भुजगस्येव खलस्य नामृतम् ।
प्रतिपादय भक्तिमेव मे
परिगृह्रन्त्वमृतं त्वघादय: ॥३८॥
अदया च दयाऽप्रियाप्रिये
तव जाये किमु तत्र सा दया ।
भुवनत्रयपुत्रका परं
प्रथमा हन्त मदेकपुत्रका ॥३९॥
इह जन्मनि जातदर्शन:
किमयं वा वृणुयान्न वेद्‍म्यहम् ।
इति चेत्परिपूरयेप्सितं
ननु यद्यस्य मुधादयानिधे ॥४०॥

N/A

References : N/A
Last Updated : January 24, 2019

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP