श्रीशंभू महादेवाची आरती
श्रीमांगीशमहात्म्य
जयदेव जयदेव जय श्रीमांगीशा हो जय श्रीअविनाशा ।
जय शिंगणापुरवासी पार्वती-परमेशा ॥ध्रु ॥
ब्रह्मांडासी व्यापुनि जें कां सत उरलें ।
तें या कोथलपर्वतिं येउनि स्थित झालें ॥
पदनत रक्षाया हें सदगुणरुप धरिलें ।
पतित-पापाब्धि-नर अगणित उध्दरिले ॥१॥
जयजय शिवहर शंकर शंभो मदनारी ।
विश्वेश्वर गंगाधर भगवान त्रिपुरारी ॥
शूली सांब सदाशिव मृडा भवहारी ।
हालाहल कंठामधें अर्धांगी नारी ॥२॥
कंठिं मनगटिं काटिला अहि ते वळवळती ।
रुद्राक्षाच्या माळा सर्वांगा विभुती ॥
मस्तकिं मुगुट जटेचा, इंदू त्यावरती ।
गिरिजेसम या प्रभुची दवण्यावर प्रीती ॥३॥
आतां अंत न पाहीं हे जगदाभरणा ।
आयु, बल, धन देवुनि करणें अघ-हरणा ॥
चिंता मनिंची वारून विलया ने दैन ।
दवण्यासम मानी या गणुच्या नव -कवना ॥४॥
॥ श्रीमांगीशमहात्म्यसातामृत संपूर्ण ॥
N/A
References : N/A
Last Updated : December 26, 2019
TOP