श्री गोविंदचरितमानस - आरती
भगवान सद्गुरु श्रीगोविंद अनंत ऊर्फ श्रीमामामहाराज केळकर यांचे चरित्र.
आरती गोविंदा । नित्त्य कीर्तनानंदा ।
सच्चिदानंदकंदा । गुरुलिंगसाधुबोधा ॥धृ॥
हनुमंत सद्गुरु आज्ञे । केले अखंड कीर्तन ।
सर्वस्व वेचीयेले । समर्पीले पंचप्राण ॥१॥
ब्रह्मचैतन्यादी संत । भाऊराव समर्थ ।
रामचंद्र नारायण । नाम बोधी हे कथीत ॥२॥
श्रीराम जयराम जयजयराम । तेरा अक्षरे परम ।
संदेश निर्वाणीचा । पायी लोळे दासराम ॥३॥
- राम गोविंद केळकर, सांगली.
N/A
References : N/A
Last Updated : November 29, 2020
TOP