मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्रीकल्हळिवेंकटेश देवचरित्र| द्वादशाक्षरी मंत्र-गीती श्रीकल्हळिवेंकटेश देवचरित्र प्रस्तावना अध्याय १ अध्याय २ अध्याय ३ अध्याय ४ अध्याय ५ अध्याय ६ अध्याय ७ अध्याय ८ अध्याय ९ अध्याय १० अध्याय ११ आरती हरिहराची द्वादशाक्षरी मंत्र-गीती द्वादशाक्षरी मंत्र-गीती श्रीकल्हळिवेंकटेश Tags : kalhali venkatesh venkateshmarathiकल्हळि वेंकटेशमरठीवेंकटेश द्वादशाक्षरी मंत्र-गीती Translation - भाषांतर ॐ - इत्येकाक्षर जें तें ब्रह्मचि तूं अनादि अविकार ॥ परि भक्तांस्तव धरिसी रुपें विधि हरिहरादि साकार ॥१॥न - मितों तुम्हां त्रिवर्गां एकचि जाणुनि सदैव चरणाला ॥नाहीं उपाय यासम भद्रक, - भीषण-भवाब्धितरणाला ॥२॥मो - दें यास्तव सुरवर ऋषिमुनि नर दितिसुतादि पदकमला ॥स्तविती त्यातें शोभे अंकीं ज्याच्या पयाब्धिजा कमला ॥३॥भ - द्रचि भद्रापतिच्या नमितां चरणांबुजा सदारा हो ॥त्यावरि मम मन मधुकर मधुरस चाखावया सदा राहो ॥४॥ग - रुडध्वज प्रभुवर प्राप्तीस्तव जन अदभ्र धडपडतो ॥ परि तो सुभक्तिवांचुनि अन्य उपायें कशास सांपडतो ॥५॥व - रिवस्या या प्रभुची भावें साहोन सर्व दु:खास ॥करितां प्रेमें होतो भक्तांचा तो खरा सखा खास ॥६॥ते - जें शौर्यें वीर्यें वदान्यहि तसा कुठेंच नच दुसरा ॥यास्तव दयार्द्र विभुतें भजा न विसरा दुजा नसे असरा ॥७॥वा - णी कर्णीं शिरतां दीन गजाची स्वपात्र जो सारी ॥धांवे उध्दरि भक्ता करुणाघन तोचि कृष्ण कंसारी ॥८॥सु - तुपा तपोनि सुसती वरिती झाली जगन्निवासास ॥ देवी भार्गवि राहे चरणीं प्रभुच्या सुखें निवासास ॥९॥दे - वा अनन्यभावें जो भजतो तो भवाब्धि खचित तरे ॥ होतो विमुख तया तो जगतीं या जित असोन मृतवत् रे ॥१०॥वा - ला नामें तरला झाला वाल्मिकि जगांत आदयकवि ॥रचिलें रामायण जें भावी होणार तेंच आयकवि ॥११॥य - दुकुलभूषण भावें नमितों श्रीवेंकटेश तव चरण ॥दे हे दासा हरिला हृदयीं राहो सदा प्रभुस्मरण ॥१२॥ N/A References : N/A Last Updated : March 16, 2021 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP