मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|शब्द फुलोरा|विषयसापेक्ष कविता| देणगी विषयसापेक्ष कविता स्वर - ताज समरांगण सूत्रधार नव-कविता साधना आदर्श सांवळा केदार-नाथ बालक देणगी यमुना काठीं मधु-मालती चुटके कवितेतत्ली कोडी सुभाषिते देव-भजनीं पक्षी पक्षांची देशभक्ती पक्षांची निवडणूक विषयसापेक्ष कविता - देणगी गो.रं.आंबेकरांचा जन्म कर्नाटकातील कुनगोळ गावचा. Tags : g r ambekarshabda phuloraगो रं आंबेकरशब्द फुलोरा देणगी Translation - भाषांतर गोड गुलाबाची कळी । कोठे दिसेनाशी झाली ।बाळाच्या ग गालांवर । `सापडली सापडली ॥१॥प्राजक्ताचे देठ लाल । वार्याने का हेलावले ।गर्द रंग उतरला । आणि रंगली पाऊले ॥२॥जळावरी नाचतात । त्याच कळ्या कमलांच्या ।बाळ दावि हालवोनी । `पहा माझ्या हाती आल्या' ॥३॥फिकुटला दिसे चाफा । आणि तशीच केतकी ।कानी कुजबुजे कोणी । बाळा अंगी आली कान्ती ॥४॥मृदु रेशमी कुरळे । डोले लाडिक जावळ ।वारा हळूच येऊन । हात फिरवून जाय ॥५॥काळेभोर ते लोचन । भासे हरिण-शावक ।दिले बक्षीस तयाने । गोड बाळास पाहून ॥६॥छोटया ओठांचे बोळके । सदा हास्याने भरले ।`हुं' काराने सांगितले । `घ्या हो घ्याहो' हे डबोले. N/A References : N/A Last Updated : February 10, 2023 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP