विषयसापेक्ष कविता - चुटके

गो.रं.आंबेकरांचा जन्म कर्नाटकातील कुनगोळ गावचा.


जन्म-मरण

`मातृपदाचे रुग्णालय' उद्घाटन करुनी आलो ।
तोच समजले `पंत वारले,' शोकसभेसि निघालो ॥

गरिबी हटाव

`हटाव गरिबी' बाई वदल्या, चमत्कार तो घडोनिया आला ।
`गरिब बिचार्‍या' साठांचा तो, संच अता मंत्रीगण बनला ॥

हरित - क्रान्ति

भर्जरि हिरवी साडी, चुडे शिणगार तियेला शोभे ।
विवाह होवुनि, वर्ष जाहले, हरितक्रांति तरुला लाभें ।

प्रभाव

नत्र, झाडांना युरीया, घालितो, फलभार हेतू ।
साध्य होते ना तिथें ते, नवशिशू सदनीं परंतू ।

परिवर्तन

वाट ही, परिवर्तनाची मर्द झुल्फे वाढवितो ।
नार घे, पेशा नराचा, ओळखेना, `ती' न `तो' ॥

उद्घाटन

प्रसूतीगृहां चालविण्याचा, महिला डाँक्टर विचार झाला ।
सुमुहूर्ताचीं वाट पाहतां, तिची प्रसूती, त्याच गृहाला ।

अलंकार

तो - अलंकार ते हवे कशाला, हेमांगी तू, नाव सुवर्णा ।
ती - फेका वस्त्रे अंगावरची नाव दिगंबर, तुम्ही साजणा ।
पत्नीचा तो पदर फडफडे नवर्‍यामागें स्कूटरवरुनीं
नवीन फँशन, त्या पदराची, चौपट खपले वाण दुकानीं ॥

परदेशा पाहुणे पाहती कसे नियंत्रण रहदारीचें ?
रस्ता भरतां, ताबा घेवुनि, तांडे येतीं, गाई-म्हशींचे ।

सहकार्यानें कितीक धंदे, येतीं उदयाला ।
पोलिस - दादा - गट्टी, भट्टी, सुयोग धंद्याला ॥

मस्तकीं माळूनि पुष्पें, फुलविते नारी बगीचा ।
बुध्दिवादी, मूढ वा ती, धुंद नर, जाणील कैचा ? ॥

मन सखीच्या पावलांचे रुप ना वर्णू सफाई ।
जोड नूतन, पादुकांचा, शतदिनां वरती न जाई ॥

सागरावरीं जहाज चाले, भल्या उंच शीडानें ।
दिसे न कोणां, पाई वायू तो, वाहुनि ने तेजानें ॥

देव दिसेना सर्व ठिकाणीं, म्हणोनि माता पृथ्वींवरतीं ।
संपत्ती ना, सकल जनांना, म्हणोनि दिधले बालक हातीं ॥

N/A

References : N/A
Last Updated : February 10, 2023

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP