विषयसापेक्ष कविता - यमुना काठीं
गो.रं.आंबेकरांचा जन्म कर्नाटकातील कुनगोळ गावचा.
वृत्त ओवी
जन विचारिती सदा । आलो आग्रा बघण्यासीं ।
काय अप्रतिम येथें ? भुलविते मानसासीं ?
बांधियेला कलाकारें । पूज्य त्रिखंडांत झाला ।
वास्तु पत्थराचीं शुभ । जावें `ताज' पहायाला ।
कला - कृती हीं दूसरी । दयानंद मंदिराची ।
सर्व धर्म - तत्वे येथे । एकवटली ही याची ।
शांत निर्मळ अथांग । यमुनेचे वाहे जळ ।
वायु वरुनी तरंगे । परिसर हो शीतल ।
यमुनेच्या सानिध्यांत । वसें एक घरकुल ।
कृष्ण रुपडे तथांत । दुडदुडते बघाल ।
बहुरुपी बाळ शोभे । रुप पालटे घडीला ।
कधी `धुत्त निरंजन' । कधी हात तुमानीला ।
वेष अंगडे टोपडे । कधीं होतसे तान्हुले ।
झब्बा सुरवार कधीं । वीर बागेत खिदळे ।
चिमुकल्या मुखांतींल । निरर्थक बडबड ।
आम्हा सर्वांना वाटते । `गीता प्रवचन' गोड ।
हाच बाळ कृष्ण आम्हा । पहावया जाणे आले ।
गोड शब्दाचे संगीत । आम्हा ऐकायाचे आहे ॥
N/A
References : N/A
Last Updated : February 10, 2023
TOP