मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|निराकारी व एकतारी भजनीपदे|एकतारी पदे| पद ८ एकतारी पदे पद १ पद २ पद ३ पद ४ पद ५ पद ६ पद ७ पद ८ एकतारी पदे - पद ८ महाराष्ट्रात, विशेषतः ग्रामीण भागात एकतारी भजनी परंपरा आहे. Tags : bhajanekatarimarathipadएकतारीपदभजनमराठी पद ८ Translation - भाषांतर (चाल-लावणी रिवाज) (कांगे सुंदरी माझ्यावरती) भाद्रपदीं हे क्षुध्द चतुर्थी उत्सव हा करिती । घरोघरीं गणरायाची मूर्ति आणुनी पुजिती ॥१॥गणरायाचें स्वरुप चांगलें दिसतें सुंदर । गळा मोत्याचे हार शोभती कानी कुंडले ॥२॥मुगुट मस्तकी कैसा ब्रह्म्याने रत्नखचितची हिरे बसविले वेष्टण पिच्छांचे ॥३॥नेसावयाला पिवळा पितांबर शालुच पांघरले । पायी पैंजण नेपुरें वाजती शोभतसे सुंदर ॥४॥बसावयाला उंदीर वाहन जातसे कैलासी । ब्रह्मा विष्णु हे सदाशिवादि वंदन ते करिती ॥५॥इंद्र चंद्र हे भजती त्यातें सप्त ऋषी नमिती । स्वर्ग मृत्यु पाताळाचे लोक भावें ते भजती ॥६॥ऐसे ते महाराज भजा तुम्ही त्यातें । कार्य सकळ बा तुमचें करतील धर्मशास्त्र बोले ॥७॥धर्मशास्त्र हे वाचुनि पहावे केले ब्रह्माने । भारत भागवत उकलून पहावें लिहिलें व्यासानें ॥८॥कलियुगामध्यें देव गजानन चंडी माता ही । इच्छा तुमची पूर्ण करिल बा खरोखरी आतां ॥९॥एवढयासाठी भजा तुम्ही या श्री गणपतिराया । संकट व्यथाही दूर करिल बा भजा तुम्ही त्याते ॥१०॥याही पदाचा कर्ता दूर रामजी तुळसीमापारा । रचना केली महाड गांवी नमनचि गणपतीला ॥११॥ N/A References : N/A Last Updated : March 27, 2024 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP