मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|मराठी कथा|तात्पर्य कथा|इसापनीती|कथा ३५१ ते ४००| शिकारी, कोल्हा व वाघ कथा ३५१ ते ४०० घुबड आणि बुलबुल एक कुत्र्याची जोडी बगळा आणि राजहंस शिकारी, कोल्हा व वाघ सिंह व जंगलातील प्राणी कोळी व मासा भांडखोर मांजरे मांजर आणि कबुतरे गरुड आणि चिमणी कोकिळा, कावळा आणि घुबड कोल्हा आणि नाग निरुद्योगी माशी बुझणारा घोडा घुबड आणि लहानपाखरे शिकारी, कोल्हा व वाघ इसापने रचलेल्या गोष्टी केवळ उपदेशपर नसून अत्यंत रंजक आहेत. Many stories included in Aesop's Fables, are distinguished by its own special characteristics and moral. Tags : aesop fablesbalkathahunterइसापनीतीतात्पर्य कथाबालकथा शिकारी, कोल्हा व वाघ Translation - भाषांतर एका शिकार्याने रानात एक कोल्हा पाहिला. तो इतका सुंदर दिसत होता की, त्याचे कातडे आपल्याजवळ असावे अशी त्या शिकार्याला इच्छा झाली. त्याने त्या कोल्ह्याचे बीळ शोधून काढले व त्या बिळाच्या तोंडापुढे एक खड्डा खणला. नंतर त्या खड्ड्यात काही वाळलेली झुडपे घातली व त्यावर मोठा मांसाचा तुकडा ठेवला. कोल्हा तो मांसाचा तुकडा पाहून तेथे येईल व खड्ड्यात पडेल असे त्याला वाटले. सर्व तयारीनंतर तो शिकारी एका झाडापाठीमागे लपून बसला. थोडया वेळाने कोल्हा बाहेर आला व समोरच असलेला मांसाचा तुकडा पाहून तो खावा असे त्याला वाटले; पण त्यात काहीतरी कट असावा असे वाटून तो पुन्हा आपल्या बिळात जाऊन बसला. इतक्यात एक वाघ तेथे आला. काही विचार न करता त्याने त्या मांसाच्या तुकड्यावर झडप घातली व तो खड्ड्यात पडला. त्याच्या पडण्याचा आवाज त्या शिकार्याने ऐकला व तो धावत तेथे गेला. खड्ड्यात कोल्हा पडला असे समजून त्याने खड्ड्यात उडी मारली, तेव्हा वाघाने त्याला फाडून खाल्ले. तात्पर्य - अविचाराने नेहमी अनर्थ घडत असतात. N/A References : N/A Last Updated : January 10, 2008 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP