कोकिळ पक्षी कधी स्वतः घरटे बांधत नाही. अंडी घालायची वेळ आली म्हणजे कोकिळा आपली अंडी एखाद्या कावळ्याच्या घरट्यात घालते. पिल्ले बाहेर पडून उडू लागेपर्यंत कावळा त्यांचे रक्षण करतो. एकदा एक कोकिळा एका घुबडाजवळ येऊन त्याला म्हणाली, 'घुबडदादा, हे कावळे किती दुष्ट आहेत पहा ! माझी अंडी पूर्ण विश्वासाने मी त्यांच्या स्वाधीन करतो. पण याबद्दल ते मला काय बक्षीस देतात पहा ! मी कुठेही एकटी सापडले तर ते माझा पाठलाग करून जीव नकोसा करतात. ही काय त्याची रीत झाली ?' घुबड म्हणाले, 'अग कृतघ्न कोकिळे, तुझ्या पिल्लांना तू टाकून दिलंस, त्यावेळी ज्या कावळ्यांनी मायेने त्यांना वाढवलं, त्यांचे उपकार तू विसरून जातेस, त्या अर्थी कावळे तुला टोचतात हेच योग्य.'
तात्पर्य - दुसर्याला उपदेश करून पांडित्य दाखविण्यापेक्षा प्रथम आपली वागणूक सुधारावी.