मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|कुसुमाग्रज|विशाखा संग्रह १| तरीही केधवा विशाखा संग्रह १ दूर मनोर्यांत हिमलाट स्वप्नाची समाप्ति ग्रीष्माची चाहूल अहि नकुल किनार्यावर अवशेष मातीची दर्पोक्ति गोदाकाठचा संधिकाल स्मृति जालियनवाला बाग जा जरा पूर्वेकडे तरीही केधवा मूर्तिभंजक कोलंबसाचे गर्वगीत आस बळी लिलाव पृथ्वीचे प्रेमगीत गुलाम तरीही केधवा ’कुसुमाग्रज’ या टोपणनावाने श्री. विष्णू वामन शिरवाडकर (१९१२-१९९९) यांनी मराठीत लेखन केले. Tags : kusumagrajpoemकविताकुसुमाग्रज तरीही केधवा Translation - भाषांतर दोघांत आजला अफाट अन्तर जुळून पाकळ्या उडाल्या नंतर- जीवनावाचून जळला अंकुर प्रश्नहि राहिला राहिले उत्तर ! संग्रामी आजला शोधतो जीवित उरींचे ओघळ दाबून उरात- उठती भोवती धुळीचे पर्वत अखण्ड फिरते वरून कर्वत ! वादळी रणांत करणे कोठून नाजूक भावांचे लालनपालन- तरीही केधवा पडता पथारी थडगी दुभंग होतात अंतरी- आठवे तुझ्या ते प्रीतीचे मोहळ आणि हो बिछाना आगीचा ओहळ ! N/A References : कवी - कुसुमाग्रज ठिकाण - मुंबई सन - १९३७ Last Updated : October 11, 2012 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP