मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|बालसाहित्य|बाल गीते| संग्रह २|
अर्धाच का ग दिवस आणि अ...

बालगीत - अर्धाच का ग दिवस आणि अ...

शब्दातून निसर्गाशी खेळताना सूर्य, चंद्र, तारे, वारे मुलांचेचे सवंगडी होतात.


अर्धाच का ग दिवस

आणि अर्धी रात्र असते,

सारखं सारखं विचारलं, की

आई हळूच हसते.

दिवसा असतो उजेड

आणि काळोख कसा रात्री

माझ्यासारखी शूर मुलं

होतात कशी भित्री ?

सूर्य मोठ्‌ठा दिवसभर

फिरतो गरगर आकाशात

दिसेनासा होतो कसा

चांदण्याच्या प्रकाशात ?

दिवसभर उघडे डोळे

रात्री पापण्याच मिटतात

आपोआपच झोपतात सगळे

कसे सकाळीच उठतात ?

घरामधल्या कुणालाच

उत्‍तर येत नाही

शाळेमधेच खरं कळेल

हुश्शार फक्‍त बाई !

N/A

References :

कवयित्री - माधुरी माटे

Last Updated : December 26, 2007

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP