तंत्र आणि विज्ञान युगातील
आम्ही बालके सारी
ज्ञानाच्या पंखांनी आता
घेऊ उंच भरारी
राष्ट्राची सर्वोच्च धुरा ही
विज्ञानाच्या हाती
अभिमानाने गातो आम्ही
या देशाची महती
विविध फुले अन् धर्मांनी
नटलेला भारत सारा
पण सर्वांना मनापासुनी
एक तिरंगा प्यारा
शिरीष हुतात्मा आदर्श अमुचा
आम्ही शूर शिपाई
भारतभूच्या अखंडतेची
जिंकू आम्ही लढाई