मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|बालसाहित्य|बाल गीते| संग्रह ३|
नमो मायभूमी , नमो पुण्यमा...

बालगीत - नमो मायभूमी , नमो पुण्यमा...

मायभूमी या विषयांवरील कविता मुलांमध्ये निष्‍ठेचे स्फुलिंग चेतवतात आणि राष्‍ट्राविषयी आपल्या जबाबदारीची जाणीव करुन देतात.


नमो मायभूमी, नमो पुण्यमाता

मनी हर्ष होई, तुझे गीत गाता ॥

तुझ्या कृपाछत्रे, आम्ही वाढलो गे

तुझ्या नभछाये, आम्ही खेळलो गे

तुझ्या अन्न-वायुवरी पोसलो गे

उधाणी हृद्‌लहरी, यशोगीत गाता ॥

उदरी तुझ्या गे बहु रत्‍नराशी

धरणे-सरिता ही नवी तीर्थकाशी

विपत्‍काल येता, तमा तूच नाशी

कंठातुनी कोटी, स्मरे पुण्यगाथा ॥

जडो सत्कर्मी, मना स्फूर्तिदात्री

महामानवांची जननी तू धात्री

’मानव्य पसरो’ सकळांत मैत्री

पुन्हा जन्म लाभो, याच भूमीत माते !

N/A

References :

कवी - मधुकर आसरे

Last Updated : December 26, 2007

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP