Dictionaries | References

घोडा

   
Script: Devanagari

घोडा

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   Desist in time; the matter is difficult; retreat whilst you may.
   ghōḍā . Add:--17 A chopping block.

घोडा

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
  m  A horse. The knight at chess. The cock of a gun. A term for a big lubberly, giddy boy. The posture upon hands and knees of a child beginning to crawl.
-कर.  
घोडा काढणें   To put out a horse.
घोडा हांकणें   To take one's self off, to decamp.
घोड्यावर घोडा घाळणें   To bid up; to outbid; to vie at auctions.
घोड्यावर बसणें   To be drunk; to reel and stagger under intoxication.
घोड्यावर बसून येणें   To be in a violent hurry.
हा घोडा हें मैदान, घोडा मैदान जवळच आहे   Why reason about it? Here! We can put it to the test.
सर घो़ड्या पाणी खोल,- पाणी पी   Desist in time; the matter is difficult, retreat whilst you may.

घोडा

 ना.  अश्व , घोक , तुरग , वाजी , वारू , हय .

घोडा

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 noun  ओझे वाहणे, गाडी ओढणे किंवा बसण्यासाठी उपयोगात आणला जाणारा, शींग नसलेला एक चतुष्पाद प्राणी   Ex. प्राचीन काळापासून अरबस्थानातले घोडे प्रसिद्ध आहेत.
HOLO MEMBER COLLECTION:
पागा अश्वदळ फिल्ड
HYPONYMY:
तट्टू घोडी टाकण वृषणाश्व उच्चैःश्रवा सैंधव अरबी घोडा मुश्की घोडा बदामी घोडा तुर्की घोडा शिंगरू घोडा घाऱ्या डोळ्यांचा घोडा बलाहक वाह्लीक घोडा दानवज्र आजानेय अरजल सबज्या पंचकल्याण मारवाडी श्यामकर्ण पोनी वीरभद्र
MERO COMPONENT OBJECT:
टाप
ONTOLOGY:
स्तनपायी (Mammal)जन्तु (Fauna)सजीव (Animate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
अश्व तुरग तुरंग तुरंगम हय वारू
Wordnet:
asmঘোৰা
benঘোড়া
gujઘોડો
hinघोड़ा
kanಕುದುರೆ
kokघोडो
malകുതിര
mniꯁꯒꯣꯜ
nepघोडा
oriଘୋଡ଼ା
panਘੋੜਾ
tamகுதிரை
telగుర్రం
urdگھوڑا , اسپ
 noun  बुद्धिबळाच्या खेळातील एक सोंगटी   Ex. घोडा अडीच घरे चालतो.
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
bdगराइ
mniꯁꯒꯣꯜ
telగుర్రం
urdگھوڑا
 noun  फळा, चित्रफलक इत्यादी जमिनीपासून उंचावर उभे करण्यासाठी आधार म्हणून वापरण्यात येणारी लाकडी चौकट   Ex. फळ्याचा घोडा कुठे आहे?
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
घोडी
Wordnet:
kasسٹینٛڈ , گھوڑا
 noun  उभे राहून वाजवताना मृदंग, पखवाज इत्यादी ज्यावर ठेवतात ती घडवंची   Ex. देवळाच्या एका कोपर्‍यात मृदंग ठेवायची उंच घोडी सुनंदाला दिसली.
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
घोडी
Wordnet:
kasگھوڑا , گھوڑی
 noun  वर चढण्यासाठी असलेले साधन   Ex. बाईने घोड्यावर चढून पंखा स्वच्छ केला.
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
स्टूल
Wordnet:
bdजांख्ला गोनां टुल
benঘরাঞ্চি
kasٹوٗل
malമരക്കുതിര
sanसोपानम्
tamமரக்குதிரை
 noun  नर घोडा   Ex. आम्ही चौपाटीवर घोड्यावरून फिरलो.
ONTOLOGY:
स्तनपायी (Mammal)जन्तु (Fauna)सजीव (Animate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
अश्व तुरग तुरंग तुरंगम हय वारू
Wordnet:
asmঘোঁৰা
bdबुन्दा गराइ
gujઘોડો
kasگُر
malകുതിര
mniꯁꯒꯣꯜ꯭ꯂꯥꯕ
nepघोडा
sanअश्वः
tamஆண்குதிரை
 noun  एखाद्या घोड्यावर स्वार व्हावे त्याप्रमाणे जिच्या पाठीवर स्वार होऊन मुले खेळतात ती व्यक्ती   Ex. मुले घोड्याला जोरात पळायला सांगत आहेत.
ONTOLOGY:
व्यक्ति (Person)स्तनपायी (Mammal)जन्तु (Fauna)सजीव (Animate)संज्ञा (Noun)
   See : चाप

घोडा

  पु. १ एक मुलींचा खेळु . - मखे २३० . २ एक गवतांत आढळणारा क्रिडा . यास मुलें घोडा म्हणतात .
  पु. १ खूर असलेला एक चतुष्पाद प्राणिविशेष . ह्याचा उपयोग ओझें वाहण्याच्या , गाडी ओढण्याच्या व बसण्याच्या कामीं करतात . ह्याच्या जाती अनेक आहेत . अरबी घोडे जगप्रसिध्द आहेत . लहान घोडयास तट्टू व घोडयाच्या पोरास शिंगरूं म्हणतात . घोडयाच्या आकृतीवरून , गतीवरून , उपयोगावरून व लक्षणेनें हा शब्द अनेक वस्तूंस लावतात . २ बुध्दिबळाच्या खेळांतील एक मोहरा . हा सर्व बाजूंनीं दोन सरळ व एक आडवें ( अडीच ) घर जातो . या मोहर्‍याचा विशेष हा आहे कीं हा इतर मोहर्‍यांच्या डोक्यावरून उडून जातो , तशी गति इतर मोहर्‍यांना नसते . ३ बंदुकींतील हातोडीच्या आकाराचा अवयवविशेष . हा दाबला असतां ठिणगी उत्पन्न होते व बंदूकीचा बार उडतो ; चाप . ४ ( मुलांचे खेळ ) दोन पायांत काठी घालून ( तिला घोडा मानून ) मुलें धांवतात तो काठीचा घोडा . ५ ( उप . ) मूर्ख व ठोंब्या असा वयस्क मुलगा ; वयानें मोठा पण पोरकट मनुष्य . ६ वस्त्रें , कपडे ठेवण्यासाठीं खुंटया ठोकलेला खांब ; स्नान करणार्‍या माणसाचे कपडे ठेवण्यासाठीं खुंटया ठोकलेला खांब ; स्नान करणार्‍या माणसाचे कपडे ठेवण्याकरितां जमिनींत रोंवलेली काठी , खांब ; ( इं . ) स्टँड . ७ ( ल . ) शरीर वाहून नेतात म्हणून पायांस लक्षणेनें ( दहाबोटी ) घोडा असे संबोधितात ; तंगडया . आमचा दोन पायांचा घोडा आम्हाला हवें तेथें वाहून नेईल . ८ पाळणा टांगण्यासाठीं एका आडव्या लांकडाला चार पाय लावून करतात ती रचना ; घोडी . ९ पालखीचा दांडा ज्याला बसविलेला असतो तें दुबेळकें बेचक ; पालखीं तबेल्यांत वगैरे ठेवतांना ज्यावर ठेवतात तीं दुबेळकें असलेलीं लाकडें प्रत्येकीं . १० गाडयाच्या बैठकीच्या चौकटीचीं दोन बाजूंचीं लांब लांकडें प्रत्येकी ; गाडीच्या दांडयास आधार द्यावयाचें दुबेळकें . ११ मूल रांगावयास लागलें असतां दोन हात व दोन गुडघे जमीनीला टेकून करतें ती घोडयासारखी आकृति . ( क्रि० करणें ). १२ मृदंग ; पखवाज ठेवण्याची घडवंची ; घोडी ; ( दिवे इ० लावण्याची ) दोन बाजूस पायर्‍या असलेली घडवंची ; ( पिपें , पेटया ठेवण्याची ) लांकडी घडवंची . १३ नारळ सोलण्याचा , शेंडयास सुरी बसविलेला खांब ; नारळ सोलण्याचा एक प्रकारचा सांचा . १४ समुद्राच्या भरतीच्या पाण्याचा चढ , फुगोटी , फुगारा ; लाटेचा उंच भाग ; नद्यांच्या मुखांतून वर गेलेलें समुद्राच्या भरतीचें पाणी . - सृष्टि ५७ . १५ ओबडधोबड असा आंकडा , फांसा , पकड . १६ ( ल . ) घोडेस्वार . तीन हजार घोडा पेशव्यांचे तैनातींत ठेवावा . - विवि ८ . ७ . १२९ . १७ दाराच्या दुहेरी चौकटीच्या वरच्या बाजूचे , परस्पराला जोडणारे दोन लाकडी तुकडे ( त्यांच्याच जोडीच्या खालच्या बाजूच्या तुकडयांस छिली म्हणतात ). १८ ( खाटीक इ० कांचें ) साकटणें , सकोटन ; खाटकाचा ठोकळा . १९ ( मुद्रण ) केसी व ग्याली ठेवण्यासाठीं केलेली घडवंचीवजा चौकट . २० फळा , चित्रफलक इ० उभा ठेवण्याची लाकडी उभी चौकट . २१ ( कों . ) रहाटगाडग्याचें कोळबें ज्यावर ठेवतात ती लांकडी चौकट . २२ ( पोहण्याचा ) चार भोपळयांचा तराफा . २३ ( गो . ) ( विटी दांडूचा खेळ ) विटी मारण्याचा एक प्रकार . ( क्रि० मारणें ). [ सं . घोटक ; प्रा . घोड ; गु . घोडो ; सिं . घोडो ; स्पॅनिश जि . गोरो ; अर . घोरा ] घोडी - स्त्री . १ घोडा या जातीच्या प्राण्याची मादी . २ सतार , तंबोरा इ० तंतुवाद्यांच्या भोपळयाच्या मध्यावर हस्तीदंती अगर लांकडाची पाटाच्या आकृतीची एक इंची किंवा दीड इंची पट्टीची बैठक ; तिच्यावरून तारा पुढें खुंटीस गुंडाळलेल्या असतात . ३ मुलांना शिक्षा देण्याकरितां जिला हातानें धरून शिक्षा दिलेला लोंबकळत असतो अशी आढयापासून लोंबणारी दोरी , फांसा ; मुलांस टांगण्यासाठीं उंच बांधलेली दोरी . अशी शिक्षा पूर्वी शाळांतून फार देत . ( क्रि० घेणें ; देणें ). एखाद्या मुलाशीं माझं वांकडं आलं कीं , रचलंच त्याच्यावर किटाळ आणी दिलीच त्याला पंतोजीकडून घोडी . - चंद्रग्र ८० . ४ उभें राहून पखवाज वाजविण्याकरितां पखवाज ठेवावयाची घडवंची . इतक्यांत देवळाच्या एका कोंपर्‍यांत मृदंग ठेवावयाची उंच घोडी सुनंदाला दिसली . - सुदे २५ . ५ गवत इ० वाहण्याकरितां खटार्‍यावर उभारलेला सांगाडा , चौकट . ६ फळा जमीनीपासून उंच ठेवण्याकरितां व त्याला उतार देण्याकरितां केलेली लांकडी चौकट , सांगाडा . ७ वयस्क असून पोरकटपणा करणारी , खिदडणारी मुलगी ; खिदडी ; धांगडधिंगी ; भोपळदेवता ; घोडकुदळ . ८ ( सुतारी तासावयाचें लांकूड हलूं नये म्हणून त्याला आधारभूत असें दुसरें लांकूड , चौकट इ० सोईनें बसवितात तें . ९ ( विणकामांत ) सूत उकलण्यासाठीं केलेलें लांकडी चौकटीसारखें साधन . १० ( सोनारी ) पायांत घालावयाच्या सांखळ्यांच्या कडया वांकविण्यासाठीं असलेला बोटाइतका जाड असा निमुळता मोळा . ११ ( हेट . नाविक ) पोरकें ( लहान ) शीड उभें करण्यासाठीं असलेलें कमानीसारखें लांकूड . १२ बंधार्‍याच्या मुखाशीं ( पाणी सोडण्याच्या ठिकाणीं ) पडद्यासारखी बांधलेली भिंत . हिच्यावरून पाणी जात असतें . १३ ( हेट . ) गलबताच्या कडेस शौच्यास बसण्याकरितां टांगलेली लांकडी चौकट १४ सांकटणें ; सकोटण . घोडा अर्थ १७ पहा . १५ तीन पायांचे दिवा ठेवण्याचें बुरडी तिकाटणें , तिवई . १६ पाटास जे दोन आडात मारितात ते प्रत्येकी . १७ हत्तीवरील चौकट ; हौदा . साहेब नौबतीकरितां हत्तींवर लांकडी घोडी घालून ... - ऐरा ९ . ५०६ . १८ उभें खुंडाळें . ( इं . ) स्टँड . तिकोनी खुंटयांची घोडी आणि रुमाल ठेवावे - स्वारीनियम ७० . १९ सामान ठेवण्याचा घोडा . घोडें - न . १ सामा ( लिंगभेद न धरतां ) घोडा या जातींतील जनावर . कृष्णाकांठचीं घोडीं सडपातळ पण चपळ असतात . २ खटार्‍याच्या साटीच्या चौकटीचीं दोन बाजूंचीं उभीं लाकडें ; घोडा अर्थ ९ पहा . घोडकें अर्थ १ पहा . ३ चार भोंपळे लावलेला पाण्यावर तरंगणारा तराफा . घोडा अर्थ २१ पहा . ४ ( व . ) गाडीचे दांडे - जूं ज्यावर ठेवतात तें दुबेळकें . घोडा अर्थ ९ पहा . [ सं . घोडा ] ( वाप्र . ) घोडा आडवा घालणें - ( एखाद्या कार्यात ) अडथळा , विध्न आणणें . आणि म्हणूनच तुम्ही घोडा आडवा घातलांत वाटतं ? - चंद्रग्र ६८ .
०उभा   , उभा बांधणें - ( घोडा ) थोडा वेळ थांबवणें ; जरासें थांबणे ; घाई न करणें ९ घाईत व धांदलींत असणार्‍या मनुष्यास उद्देशून ह्या वाक्प्रचाराचा उपयोग करतात . )
करणें   , उभा बांधणें - ( घोडा ) थोडा वेळ थांबवणें ; जरासें थांबणे ; घाई न करणें ९ घाईत व धांदलींत असणार्‍या मनुष्यास उद्देशून ह्या वाक्प्रचाराचा उपयोग करतात . )
०काढणें   १ ( बांधून ठेवलेला घोडा बाहेर नेणें ) घोडा हांकारणें , पिटाळणें . २ ( ल . ) ( एखाद्यानें ) पळ काढणें ; पोबारा करणें ; निसटणें .
०चालविणें   ( कर . ) ( ल . ) डोकें खाजवणें ; युक्ति लढविणें .
०टाकणें   घोडा फेंकणें ; उडवणें ; अंगावर घालणें . आरेरे टाकौनि घोडा । भणती यांचिआं जटैं उपडा । - शिशु १४१ .
०मैदान   असणें - ( घोडा धांवण्यांत कसा काय आहे याची परीक्षा त्यास मैदानांत पळवून करतां येते यावरून ) ज्याची परीक्षा करावयाची तो पदार्थ , मनुष्य व परीक्षेस लागणारी सामग्री हीं दोन्ही जवळ असणें असा अर्थ होतो ; एखाद्या गोष्टीची निरर्थक चर्चा न करतां तिला कसोटीला लावणें , कसोटीची वेळ किंवा सामुग्री जवळ असणें ; हा सूर्य हा जयद्रथ . कोरडी बढाई कशाला पाहिजे ? घोडामैदान जवळच आहे .
जवळ   असणें - ( घोडा धांवण्यांत कसा काय आहे याची परीक्षा त्यास मैदानांत पळवून करतां येते यावरून ) ज्याची परीक्षा करावयाची तो पदार्थ , मनुष्य व परीक्षेस लागणारी सामग्री हीं दोन्ही जवळ असणें असा अर्थ होतो ; एखाद्या गोष्टीची निरर्थक चर्चा न करतां तिला कसोटीला लावणें , कसोटीची वेळ किंवा सामुग्री जवळ असणें ; हा सूर्य हा जयद्रथ . कोरडी बढाई कशाला पाहिजे ? घोडामैदान जवळच आहे .
०हांकणें   पळून जाणें ; निघून जाणें . पोबारा करणें ; घोडा काढणें पहा . पंतोजीबुवास पाहून त्या पोरानें घोडा हांकला . घोडी काढणें , घोडी भरविणें - सक्रि . ( माण . ) घोडीस घोडा दाखविणें , देणें ; घोडी फळविणें . घोडी घेणें - ( एखाद्याशीं ) घांसणें ; कटकट करणें ; मत्सरबुध्दीनें दोष काढणे . घोडें उभें करणें - अडथळा आणणें . बाळासाहेब नातूसारख्यांनीं विशेष प्रसंगीं एखादें घोडें उभें केलें तरी त्याकडे दुर्लक्ष्य करून ज्यानें त्यानें आपला पंथ सुधारावा . - आगर ३ . १४४ . ( एखाद्याचें ) घोडें थकणें - एखाद्यानें ( प्रवास , धंदा , व्यापार , अभ्यास इ० कांत ) थकून जाणें ; हतबल होणें ; पुढें रेटण्याची शक्ति न उरणें . ( एखाद्यानें आपलें ) घोडें पुढें दामटणें , घोडें ढकलणें , घोडें हांकणें , घोडें घालणें - १ इतरांच्या पूर्वी आपला कार्यभाग साधून घेण्याचा घाईनें प्रयत्न करणें . या शर्यतींत जो तो आपलें घोडें पुढें दामटायला पहात आहे . - नि . ब्रिटिश वसाहतीनीं आपल्या हक्कांचें घोडें पुढें दामटलें . - सासं २ . ४४६ . २ लुब्रेपणानें दुसर्‍यांच्या संभाषणांत तोंड घालून त्यांच्यावर आपले विचार लादणें . ( एखाद्याचें ) घोडें मारणें - एखाद्याचें नुकसान करून त्याला राग आणणें ( पूर्वी प्रवासाचें मुख्य साधन घोडें असे . प्रवासाचें घोडें ठार केल्यास त्याचा प्रवास थांबत असे व त्यामुळें त्याचें फार नुकसान होई यावरून ) एखाद्याचें फार नुकसान करणें . मी काय तुझें घोडें मारलें आहे ? ( आपलें ) घोडें पुढें ढकलणें - आपलें काम प्रथम करूं लागणें ; आपल्या कामाला महत्व देणें . गांडी खालचें घोडें - संसारादि निर्वाहक मालमत्ता , वाडी इ० आधारभूत मुख्य साधन . म्ह० आपले गांडीखालचें घोडें गेलें , मग त्यावर महार बसो कीं चांभार बसो . घोडीं घालणें , घोडयांच्या अनीना उचलणें - घोडदळांतील सर्व स्वारांनीं ईर्षेनें शत्रूवर एकदम तुटून पडणें . - होकै ३ . घोडयाच्या , हत्तीच्या पायांनीं येणें मुंगीच्या पायांनीं जाणें - ( आजार , संकट , अडचण इ० च्या संबंधांत हा वाक्प्रचार योजतात ) जलदीनें येणें व धिमेधिमे जाणें ; आजार इ० जलदीनें येतात पण अतिशय हळू हळू नाहींसे होतात यावरून वरील वाक्प्रचार रूढ आहे . ( एखाद्याच्या ) घोडयानें पेण खाणें , घोडयानें पेंड खाणें - या वाक्प्रचारांत पेण = प्रवासांतील टप्पा , मुक्कामाची जागा या ऐवजीं चुकीनें पेंड हा शब्द उपयोगांत आणतात . लांबच्या प्रवासांत निरनिरळया टप्प्यांच्या ठिकाणीं घोडीं उभीं रहात . त्यामुळें टप्प्याचें ठिकाण आलें कीं घोडें तेथें अडे , पुढें जात नसे . यावरून वरील वाक्प्रचार एखादें कार्य करतांना कोणी अडून बसल्यास त्यास . तुझें घोडें कुठें पेण खातें असें विचारतांना उपयोगांत आणतात . घोडयापुढें धावणें - जिकीरीचें , दगदगीचें ; कष्टाचें काम करणें . ( एखाद्याच्या ) घोडयापुढें धावणें - एखाद्याची कष्टाची सेवा , चाकरी करणें ; ( उप . ) एखाद्याची ओंगळ खुशामत करणें ; एखाद्याची थुंकी झेलणें . घोडयावर घोडा घालणें - ( लिलांव इ० कांत ) चढाओढ करणें ; एखाद्यानें केलेल्या किंमतीपेक्षां अधिक किंमत पुकारणें ; उडीवर उडी घालणें . घोडयावर बसणें - दारू पिऊन झिंगणें ; ताठयांत असणें . घोडयावर बसून येणें - घाईनें येणें ; आपलें काम तांतडीनें करण्यास दुसर्‍यास घाई करणें . सर घोडया पाणी खोल किंवा पाणी पी - ( घोडया मागे हट , पाणी खोल आहे . तेथूनच पाणी पी ) गोष्ट मोठी कठिण आहे , मागें परततां येणें शक्य आहे तोंच परतावें याअर्थी . म्ह० १ घोडा आपल्या गुणानें दाणा खातो = चांगला घोडा खूप काम करून आपल्याला खाद्यहि जास्त मिळवतो . त्याला जास्त देण्यास मालक असंतुष्ट नसतो . यावरून चांगला चाकर आपल्या गुणानें व मेहनतीनें मालकाकडून पगार वाढवून घेतो . २ घोडा स्वार ( मांड ) ओळखतो = बसणारा कच्चा कीं पक्का आहे हें घोडा ओळखूं शकतो . ( यावरून ), आपला मालक कडक कीं नरम आहे हें हाताखालचीं माणसे ओळखू शकतात . ३ ( व . ) जाय रे घोडया खाय रे हरळी = घोडयाला हरळी खावयास मोकाट सोडल्यास ( घोडयाला ) तें चांगलेच होईल , पथ्यावरच पडेल . म्ह० १ घोडी मरे भारें शिंगरूं मरे येरझारें = घोडी ओझें किंवा माणूस वाहून नेत असतां तिचें शिंगरूंहि तिच्याबरोबर शिंगरूंहि हेलपाटा खातें . यावरून प्रत्यक्ष काम करणारास श्रम होतातच पण त्याच्या सहवासांत असणारांना सुध्दां जवळ जवळ तितकेच श्रम होतात . २ वरातीमागून घोडें = लग्नाच्या वरातीच्या मिरवणुकींत सर्वांच्या पुढें श्रृंगारलेलें कोतवाली घोडें चालवण्याची चाल आहे . यावरून वरात निघून गेल्यावर मागाहून श्रृंगारलेलें घोडें नेणें व्यर्थ होय . २ माझें घोडें आणि जाऊं दे पुढें = इतरांचें कांहींहि होवो , माझें काम आधीं झालें पाहिजे . स्वार्थी माणसाची निंदा करतांना या म्हणीचा उपयोग करतात . समासांत घोडा शब्द पूर्वपदीं आल्यास त्याचीं घोड किंवा कधीं कधीं घोडे अथवा घोड व घोडे , अशीं दोन्ही रूपें होतात . उ० घोडचूक ; घोडेखोत ; घोड ( डे ) चिलट इ० सामाशब्द - घोडकट , घोडकें - न . ( घोडयाला तिरस्काराने लावावयाचा शब्द ) रोडकें , अशक्त व थिल्लर घोडें ; भटाचा तट्टू . घोडकुदळ - पु . १ ( उप . ) मुंजीचें वय झालेलें असून मुंज न झालेला मुलगा ; घोडमुंज्या . २ - स्त्री . ( उप . ) उपवर असून लग्न न झालेली दांडगट नाचरी मुलगी ; घोडी ; घोडगी ; भोपळ - देवता ; घोडनवरी ; घोडी पहा . घोडकूल - न . १ ( गो . ) लहान घोडें ; तट्टू २ ( खा . ) ओटयाच्या खांबावर तिरपा टेंकू ( कर्ण ) देऊन त्यावर कोरलेली घोडयाची आकृति . घोडकें , घोडका - नपु . १ ज्याच्या भरीला करळया व तरसे घालून गाडयाची तक्तपोशी , बैठक तयार करतात अशीं चौकटींतील दोन बाजूचीं दोन उभीं लांब लांकडें . २ तेल्याच्या घाण्याच्या कातरीला खिळलेलें व जुंवाचा दोर बांधावायाचें लांकूड . घोडके - ढोरांचा गुरु . - गांगा २६ . घोडकेळ - न . ( क्क . ) एक हलक्या जातीचें भसाडें केळें . [ घोडा + केळें ] घोडक्या , घोडका - पु . १ घोडयाचा खिजमतगार ; मोतद्दार . घोडयास शिपाई काय करिल घोडका । - ऐपो ३७२ . २ चाबुकस्वार ; अश्वशिक्षक ; घोडा अर्थ ९ मधील शेवटचा अर्थ पहा . घोडकोस - पु . ( गो . ) तीन मैलांचा कोस . घोडगा , घोडगी - पुस्त्री . ( उप . ) वयानें प्रौढ पण पोरकटपणा , नाचरेपणा अंगीं असलेला मुलगा , मुलगी ; घोडा अर्थ ५ पहा . घोडी अर्थ ७ पहा . घोडगांठ , घोडेगांठ - स्त्री . ( बुध्दिबळांचा खेळ ). एकमेकांच्या जोरांत असलेली घोडयांची दुक्कल . घोडचवड - स्त्री . घोडदौड ; घोडा चौफेर उडविणें ; चवडचाल . घोडचवडीखालीं नाना पुण्याला आला . - ऐपो १६२ . [ घोडा + चवड = विशिष्ट चाल ] घोडचाल - स्त्री . घोडयाची चाल . ( ल . ) जलद चाल . [ घोडा + चाल ] घोडचिलट , घोडेचिलट - न . मोठें चिलट ; डांस ; मच्छर . घोडचूक - स्त्री . मोठी व अक्षम्य चूक . घोडचोटया - वि . १ ( मनुष्य ). ( अश्लील ) घोडयाच्या चोटासारखा मोठा चोट ज्याचा आहे असा २ ( निंदार्थी ) मुंज न झालेला , वाढलेला मुलगा ; घोडकुदळ ; घोडमुंज्या . घोडजांवई - पु . ( उप . ) मोठया वयाचा नवरामुलगा ; घोडनवरा . घोडजाळी - स्त्री . ( भोंवर्‍यांचा खेळ ) विरुध्द पक्षाच्या भोंवर्‍याला खोंचा देऊन आपला भोंवरा दूर जाऊन फिरत राहील अशा रीतीनें भोंवरा फेकण्याचा प्रकार . [ घोडा + जाळी = दोरी ] घोडतोंडया - वि . घोडयाच्या तोंडासारखा लांबट चेहरा असलेला ; कुरूप ; लांबट , ओबडधोबड तोंडवळयाचा . [ घोड + तोंड = चेहरा ] घोडदळ - न . १ घोडेस्वारांचें सैन्य ; फौज . २ सैन्यांतील घोडेस्वारांचें पथक , तुकडी . [ घोडा + दळ = सैन्य ] घोडदौड - स्त्री . घोडयासारखें पळणें ; घोडयाची दौड ; जलद जाणें . [ घोडा + दौड = पळणें ] घोडनट - न . ज्याचें एक तोंड आढयावर व एक लगीवर येऊन दरम्यान तिरपें राहतें असें लांकूड ठोकतात तें . घोडनवरा - पु . ( उप . ) प्रौढवयाचा नवरामुलगा ; घोडजांवई . घोडनवरी , घोडेनवरी - स्त्री . ( उप . ) मोठया वयाची नवरी मुलगी , वधू ; योग्य व सामान्य वयोमर्यादेबाहेर अविवाहित राहिलेली मुलगी . हे मोठमोठया घोडनवर्‍या घरांत बाळगल्याचे परिणाम बरं ! - झांमू . घोडपाळणा , घोडेपाळणा - पु . घोडयाला ( लांकडी चौकटीला ) टांगलेला पाळणा ; हलग्याना न टांगतां जमीनीवर घोडयास अडकविलेला पाळण्याचा एक प्रकार , घोडा ८ अर्थ पहा . घोड पिंपळी - स्त्री . पिंपळीची मोठी जात ; हिच्या उलट लवंगी पिंपळी . घोडपुत्र - पु . घोडयाला ( विशेषत : बुध्दिबळांतील घोडयाला ) प्रेमाने किंवा प्रतिष्ठेनें संबोधण्याचा शब्द . [ घोडा + पुत्र = मुलगा ] घोडपेटें - न . १ दोन भोपळे पुढें व दोन मागें बांधून केलेला तराफा ; घोडा अर्थ २१ पहा . २ भोंपळयावर दोन्ही बाजूस पाय टाकून घोडयासारखें बसून पाण्यावर तरणें , तरंगणें . घोडबच्य - न . दुबळा घोडा पुष्ट होण्यास एक औषध . घोडबच्य पावशेर , राई पावशेर भाजलेलीं काळी मिरें पावशेर ... मिश्रणापैकीं आतपाव दररोज देत जावें . - अश्वप १ . १७५ . घोडबांव - स्त्री . ( कु . ) घोडयांना पाणी पितां येईल अशा तर्‍हेनें बांधलेली विहीर . [ घोड + बांव = विहीर ] घोडबाही - स्त्री . १ दाराच्या दुहेरी चौकटीच्या आंतल्या चौकटींतील दोन्ही बाजूचे खांब . २ खटार्‍याच्या बैठकीच्या चौकटीच्या दोन बाजूंच्या लांब लांकडांपैकीं प्रत्येक ; घोडकें , घोडें पहा ; [ घोडा + बाही = बाजू ] घोडबाळ - वि . ( उप . ) पोरचाळे करणारा प्रौढ पुरुष , स्त्री ; पोरकट माणूस . [ घोडा + बाळ ] घोडब्रह्मचारी - पु . ( उप . ) लग्नाचें वय कधींच झालें असूनहि अविवाहित राहिलेला मुलगा ; घोडनवरा . [ घोडा + ब्रह्मचारी ] घोडमल्ली - स्त्री . ( बुध्दिबळांचा खेळ ) घोडयानें मात करण्याचा प्रकार . प्रतिपक्षाचें घोडें व राजा आणि आपलें घोडें , राजा व एकच प्यादें राखून प्यादेमात करणें ; घोडमात . घोडमात , घोडेमात - स्त्री . ( बुध्दिबळांचा खेळ ) घोडयानें राजाला दिलेली मात ; घोडमल्ली पहा . [ घोडा + फा . मात = कोंडणें ] घोडमाशी - स्त्री . १ मोठया आकाराची हिरवी , काळसर माशी . २ ( सामा . ) मोठी माशी . घोडमासा - पु . एक प्रकारचा मासा ; सागराश्व . ह्याचें तोंड कांहींसें घोडयासारखें दिसतें . यास लांब शेपूट असतें . हा नेहमी उभा पोहतो . घोडमुख , घोडमुख्या - पु . १ घोडयाचें तोंड असलेला किन्नर नांवाच्या देवयोनींतील पुरुष . याचें वर्णन पुराणांतरीं सांपडतें . २ ( ल . ) अगदीं कुरूप . घोडतोंडया माणूस . एक मीरवलें भुरळें पींगळें । घोडमुखें । - दाव २८५ . घोडमुंगळा - पु . मोठा व काळा मुंगळा . घोडमुंगी - स्त्री . मोठी , काळया जातीची मुंगी . घोडमुंज्या , घोडेमुंज्या - पु . उप . १ मुंज होण्याचें वय झालें असून मुंज न झालेला मुलगा . २ लग्न न झालेला प्रौढ मुंज्या . [ घोडा + मुंज्या ] घोडला - पु . मूल रांगत असतांना त्याची होणारी घोडयासारखी आकृति . घोडा अर्थ १० पहा . घोडली - स्त्री . ( कों . हेट . ) ( नाविक ) शौचास बसण्याकरितां वर्‍यास एक चौकट चार दोर्‍यांनी अडकवितात ती . [ घोडा ] घोडवळ - स्त्री . १ बांधलेल्या घोडयांची ओळ , रांग . २ घोडयांचा तबेला ; घोडशाळा ; घोडसाळ ; यावरून ( सामा . ) तबेला ; रोडोला हत्ती घोडवळींतून जाणार नाहीं . ३ लांबचलांब , ठेंगणें व बेढब घर ; मागरघर ; दांडसाळ ; केवळ तबेल्यासारखें असलेलें घर ; कोठडी . ४ ( उप . ) घोडनवरी . ५ न झोडपलेल्या , झोडपून दाणे न काढलेल्या धान्याच्या पेंढयांची रास , गंजी . [ घोडा + ओळ ] घोडवाट , घोडेवाट - स्त्री . घोडयांकरितां केलेली , फक्त घोडयाला जातां येईल अशी वाट , रस्ता ( विशेषत : डोंगर इ० याच्यावरून ); उलट गाडीवाट . [ घोडा + वाट ] घोडविवाह - पु . विषमविवाह . आपली नात शोभेल अशा दहा वर्षाच्या पोरीशीं लग्न लावण्यास तयार असतात व असा घोडविवाह करूनहि फिरून समाजांत हिंडण्यास ... त्यांस दिक्कत वाटत नाहीं - टि ४ . ९६ . [ घोडा + विवाह ] घोडवेल - स्त्री . ( सांकेतिक ) घोडयाची लीद ; ( औषधांत घोडयाच्या लिदीचा उपयोग करावयाचा असल्यास तिचा निर्देश ह्या शब्दानें करतात ). घोडशह - पु . ( बुध्दिबळांचा खेळ ) घोडयानें दिलेला शह . [ घोडा + शह ] घोडशाळा , घोडसाळ - स्त्री . १ घोडयांचा तबेला ; घोडवळ अर्थ २ पहा . [ घोडा + शाळा = घर ] घोडशिष्य - पु . ( निंदार्थी ) विद्यार्जन करूं पाहणारा मोठया वयाचा विद्यार्थी , मोठेपणीं शिकावयास लागाणारा मनुष्य . घोडशीर - स्त्री . १ पायाच्या टांचेच्या वरच्या बाजूस असलेली शीर , नाडी ; दवणशीर ; घोंडशीर पहा . २ ( क्क . ) पायाचा किंवा हाताचा स्नायु . घोडसटवी - स्त्री . १ उग्र स्वरूप धारण केलेली देवी . ( क्रि० लागणें ). २ घोडी व्याल्यापासून सहाव्या दिवशीं करावयाची सटवीची पूजा . ( एखादीला )
०लागणें   १ घोडसटवीप्रमाणें उग्र व विक्राळ दिसणें . २ घोटसटवीची बाधा होणें . घोडेखाद - स्त्री . १ घोडयांचे चरणें ; हरळी खाणें . या घोडे खादीमुळें माळावर एक काडी राहिली नाहीं . २ फक्त घोडयांना चरतां , खातां येईल इतक्या वाढीचें गवत . ह्या माळावर मोठें गवत नाहीं , घोडेखाद कोठें कोठें आहे . [ घोडा + खाद = खाणें ] घोडेखोत - पु . घोडे भाडयानें देण्याचा धंदा करणारा ; भाडयाच्या घोडयांचा नाईक . [ घोडा + खोत = मक्तेदार ] घोडेघाटी - स्त्री . एक प्रकारचें रेशमी कापड . घोडेघास - न . १ विलायती गवत ; लसूनघास . २ घोडकुसळी पहा . [ घोडा + पाऊल ] घोडेपाऊल - न . एक वनस्पतिविशेष . [ घोडा + पाऊल ] घोडेराऊत , घोडेस्वार - पु . घोडयावरील शिपाई घोडयाएवढी चूक - स्त्री . फार मोठीचूक ; ढोबळ चूक ; घोडचूक पहा . घोडया गोंवर - पु . एक प्रकारचा गोंवराचा आजार ; याच्या पुटकुळया मोठया असतात . [ घोडा = मोठा + गोवर ] घोडयाचा - पु . ( निंदार्थी ) घोडयावर बसलेला मनुष्य ; घोडेस्वार . ते पहा घोडयाचे चालले . मागून स्वारी येतीसें वाटतें . घोडयाचा दाणा - पु . १ ( उप . ) हरभरा . २ ( ल . ) बुंदीच्या लाडवास तिरस्कारानें म्हणतात . घोडयाचा पूत , घोडयाचा लेंक - पु . ( उप . ) मूर्ख ; गाढव ; गध्दा . घोडयाची चाकरी - स्त्री . घोडयांना दररोज चोळणें , खरारा करणें इ० काम . घोडयाची जीभ - स्त्री . ( राजा . ) एक वनस्पति विशेष . घोडयाची मुंज , घोडयाचें बारसें - स्त्रीन . एखादा कोठें जावयास निघाला असतां एखाद्या अधिक प्रसंगी व फाजिल चौकशी करणार्‍या माणसानें त्यास कां , कुठें जातां असें विचारलें असतां म्हणतात . घोडयांचें नाटक - न . ( ना . ) सर्कस . घोडयाचें मूत - न . १ कुतर्‍याचें मूत ; अळंबें ; भुईछत्री . २ कुजलेल्या लांकडांतून फुटलेलें अळंबें . घोडयाच्या पाठीवर क्रिवि . भरधाव ; झरकन ; त्वरेनें . ( क्रि० जाणें ; करणें ). घोडयाच्या पाठीवरचा कोस - पु . कंटाळवाणा व लांबणीचा कोस ; घोडयावरून गेल्यासच कोसाएवढें व कंटाळवाणें न वाटणारें अंतर .

घोडा

   घोडा आडवा घालणें
   घोडेस्‍वार भरधांव जात असतां दुसर्‍याने आपला घोडा त्‍याच्या वाटेत आणला तर पहिल्‍याला थांबावे लागते. यावरून एखाद्या कार्यात विघ्‍न, अडथळा आणणें
   प्रतिबंध करणें
   रोखणें
   शत्रूच्या मार्गात आडवे येणें. ‘जर त्‍यांनी आपल्‍यावर चालून घेतले तर आम्‍ही आडवी घोडी घालतो.’ -ख ४२९७. ‘आणि म्‍हणूनच तुम्‍ही घोडा आडवा घातला वाटतं?’ -चंद्रग्र ६८.

घोडा

नेपाली (Nepali) WN | Nepali  Nepali |   | 
 noun  सींग नभएको एउटा चौपाया जसले गाडी तान्ने र वाहनको काम गर्छ   Ex. राणा प्रतापको घोडाको नाम चेतक थियो
HOLO MEMBER COLLECTION:
अश्‍व सेना
HYPONYMY:
घोडा खच्चर टट्टू सैन्धव
ONTOLOGY:
स्तनपायी (Mammal)जन्तु (Fauna)सजीव (Animate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
अश्‍व
Wordnet:
asmঘোৰা
benঘোড়া
gujઘોડો
hinघोड़ा
kanಕುದುರೆ
kokघोडो
malകുതിര
marघोडा
mniꯁꯒꯣꯜ
oriଘୋଡ଼ା
panਘੋੜਾ
tamகுதிரை
telగుర్రం
urdگھوڑا , اسپ
 noun  पोथी घोडा   Ex. राजविन्दरको बिहामा बेहुलो सेतो घोडामा चढेर आएको थियो
ONTOLOGY:
स्तनपायी (Mammal)जन्तु (Fauna)सजीव (Animate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
अश्‍व
Wordnet:
asmঘুঁৰী
bdगराइ बुन्दि
benঘুড়ী
gujઘોડી
hinघोड़ी
kanಕುದುರೆ
kasگُرِنۍ
kokघोडी
malപെണ്കുതിര
marघोडी
mniꯁꯒꯣꯜ꯭ꯑꯃꯣꯝ
oriଘୋଡ଼ୀ
panਘੋੜੀ
sanघोटिका
tamபெண்குதிரை
telగుర్రం
urdگھوڑی , مادہ اسپ
 noun  भाले घोडा   Ex. सैनिक घोडामा होइन बरू घोडीमा सवार थिए
ONTOLOGY:
स्तनपायी (Mammal)जन्तु (Fauna)सजीव (Animate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
अश्व
Wordnet:
asmঘোঁৰা
bdबुन्दा गराइ
gujઘોડો
kasگُر
malകുതിര
mniꯁꯒꯣꯜ꯭ꯂꯥꯕ
sanअश्वः
tamஆண்குதிரை

Related Words

घोडा   बदामी घोडा   चालता घोडा   घोडा टाकणें   वाह्लीक घोडा   अरबी घोडा   करणीचा घोडा   घोडा काढणें   घोडा-गाडी   तुर्की घोडा   मुश्की घोडा   घोडा लागणें   चढणीस घोडा, रेवणीस रेडा   घाऱ्या डोळ्यांचा घोडा   घोडा मांड ओळखतो   घोडा स्‍वार ओळखतो   चढणीस घोडा, उतरणीस रेडा   मोठा घोडा, मस्तीवान थोडा   घोडीला घोडा लावणें   घे घोडा पी पाणी   हा घोडा आणि हें मैदान   मनुष्य ओळखावे संबंधीं, घोडा जेरबंदी   घोडा आपल्‍या गुणानें दाणा खातो   knight   घोडा जेरबंदीं, मनुष्‍य संबंधीं (ओळखावा)   घोडा जेरबंदी, मनुष्‍य संबंधी ओळखावा   घोडा जेरबंदी, मनुष्‍य संबंधी जाणावा   घोडा जेरबंदी, मनुष्‍य संबंधी समजावा   वेडयाला घातला खोडा आणि तो म्हणतो घोडा   घोडा चोराने नेला, मग तबेला बंद केला   घासिया घोडा, पेटिया चाकर (काय कामाचा)   गोठ्‌यांत जन्मणारा घोडा असूं शकत नाहीं   गाढव स्‍वारीस गेले, घोडा होऊन नाहीं आलें   चाबूक लगामाविना, घोडा न होय नीट जाणा   राऊत असे खरमरा तर घोडा चाले तुरतुरा   घोडा स्‍वारीस देणें, अस्‍थिचर्म माघारें घेणें   पाटलाचा घोडा(पाटलाचें घोडें), महाराला भूषण   हातीं घोडा धरुन चालावें, दमल्यावर स्वार व्हावें   घोडागाडी   trigger   नाल तो मिल गया, अब क्या रहा? जीन और घोडा   कागदाचा घोडा   कोतवाल घोडा   घोडा उभाबांधणें   घोडा चालविणें   घोडा हांकणें   अरजल घोडा   अरजली घोडा   अरजेल घोडा   दिवाळ्या घोडा   टाळीचा घोडा   रूनी घोडा   मारवाडी घोडा   धोतराचा घोडा   हरदाशी घोडा   हरदासी घोडा   बुन्दा गराइ   बदामी घोडो   بادٲمۍ گُر   வாதாம் கொட்டை நிறம்   ஆண்குதிரை   ବାଦାମୀ ଘୋଡ଼ା   घाई घोडा फेकणें   घोडा उभा करणें   घोडा पाहिला, पाय मोडला   घोडा मैदान जवळ आहे   घोडा मैदान पुढें आहे   घोड्यावर घोडा घालणें   गाढवाचा घोडा बनविणें   अश्वः   گُر   والہیٖک گُر   वाह्लीकाश्वः   مشکی   مُشکِی   கறுப்பு குதிரை   துருக்கி குதிரை   టర్కీ గుర్రం   তুর্কি ঘোড়া   বাহলীক ঘোড়া   কালো ঘোড়া   ঘোৰা   ତୁର୍କି ଘୋଡ଼ା   ବାହ୍ଲିକ ଘୋଡା   ମୁଶ୍କୀ   ରୂନୀ ଜାତି   ਮੁਸ਼ਕੀ   ਰੂਨੀ ਜਾਤੀ   મુશ્કી ઘોડો   ತುರ್ಕಿ ಕುದುರೆ   കറുത്ത കുതിര   റൂനി കുതിരകള്‍   आपल्या गुणें, घोडा खाई दाणे   घोडा आपले गुणावर दाणा वाढवितो   घोडा धांवला तर कानाचे अंतर   घोडो   ଘୋଡ଼ା   കുതിര   गराइ   रुनी   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP