|
स.क्रि. १ चोपटणें ; ( जमीन इ० ) चोपणीनें ठोंकून सपाट , साफ , टणक , गुळगुळीत करणें . २ ( ल . ) मारणें ; बडविणें ; ठोकणें ; पिटणें . - अक्रि . १ ( जमीन , भुई इ० ) खचून , खालीं बसून सपाट दिसणें . २ रोड , अशक्त होणें ; कृश होणें ; वाळणें . जनीं वनीं तुजसाठीं मनीं झुरतां मी चोपलें । - होला ९४ . उ.क्रि. ( सामा . ) चुंफणें , चोखणें . स्त्रीन . १ ( जमीन इ० ) चोपण्याची , ठोकण्याची क्रिया ( चोपणें पासून नाम ). २ गवंडयाचें जमीन चोपण्याचें लांकडी हत्यार . हें हात दीड हात लांब , वीतभर रुंद व चार पांच बोटें जाड असून , याला हातांत धरण्यासाठीं मागें एक मूठ असतें . ३ लहान मुलांचें रिंगणें ; चोखणी . ४ तेलकट कापड चिकण मातींत भिजवून ठेवणें . [ फा . चोब = काठी ? घ्व . चोप ]
|